अमरावती विभागातील एसडीओ, उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या...

  
   अमरावती विभागातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे शासन आदेश आज निर्गमित करण्यात आले असून अकोला जिल्ह्यातील अकोटचे औट घटकेचे ठरलेले 


    एसडीओ बळवंतराव अरखराव यांना अखेर अकोट उपविभागातून जावे लागत असून त्यांच्या जागी स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या दर्यापूरातील मनोज लोणारकर हे येत आहेत.अकोटच्या इतिहासात महसूल विभागाचा सगळ्यात बोगस कारभार याच अरखराव यांच्या कारकिर्दीत झाला असून साधे तलाठीही त्यांना जुमानत नसल्याचे चित्र याच आकोटकरांनी पाहिलेले आहे.



   उपरोक्त अधिका-यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदांवर अन्य अधिका-यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. राजेश्वर हांडे व योगेश खरमाटे यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, दि.०१.१२.२०२३ अन्वये नियुक्तीच्या प्रतिक्षेतील अधिका-यांनी पुढील आदेशापर्यंत संबंधित विभागीय आयुक्तांकडे रुजू व्हावे असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या