जालना येथील पत्रकार विकासकुमार बागडी यांनी दाखल केलेला अर्ज निवडणूक अधिकार्यांनी मंजूर केला असून बागडी यांनी आपल्या प्रचारास प्रारंभ देखील केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना पीपल्स बँक निवडणूकीत यावेळी आपले भविष्य आजमाविण्याचा निर्धार बागडी यांनी केला होता.
त्यानुसार त्यांनी अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज निवडणूक अधिकार्यांनी मंजूर केल्यामुळे आता बागडी यांनी आपल्या प्रचारास सुरुवात देखील केली आहे. जालना पीपल्स बँक ही व्यापार्यांची बँक असली तरी या ठिकाणी सर्वसामान्य नागरीकांचे कामे झाली पाहिजेत, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण या निवडणूकीत उतरलो असल्याचे बागडी यानी म्हटले आहे.



0 टिप्पण्या