तेलंगणा राज्याचे पोलीस महासंचालक अंजनीकुमार यांना निवडणूक आयोगाने आज तडकाफडकी निलंबित केल्याने देशभर एकच खळबळ उडाली आहे.
तेलंगणा राज्याचे पोलीस महासंचालक अंजनीकुमार यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस महासंचालक अंजनीकुमार यांनी नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच कॉन्ग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे पाहून पक्षाचे उमेदवार तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार रेवंत रेड्डी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत अभिनंदन केल्या प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सर्वप्रथम एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत "एक्स" या सोशल मीडियावर हे वृत्त दिले आहे,त्यात अंजनीकुमार हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार रेवंत रेड्डी यांची भेट घेवून त्यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन करीत असतानाचे छायाचित्र प्रकाशित केले आहे.



0 टिप्पण्या