प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना डीवायएसपी म्हणून नियुक्ती...




    राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून गृहमंत्रालयाशी संबंधित असलेल्या नियुक्त्यांबाबत "हैद्राबाद हाऊस" मधून पहिल्यांदाच आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांविषयी काहीतरी निर्णय घेण्यात आलेला असून आयपीएस झाल्यानंतर हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतून बेसिक कोर्स ट्रेनिंग पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र संवर्गातील भारतीय पोलीस सेवेच्या दहा अधिकाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर पदस्थापना देण्याबाबत आज आदेश काढण्यात आले आहेत.

                   ( अनमोल मित्तल )
   
      नाशिक ग्रामिणला मालेगाव छावणी या विभागात उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुंजाळ यांना नियुक्ती देण्यात आली असून यापूर्वी त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून सहा महिन्यांची कारकीर्द यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे,


 त्याच अकोट उपविभागात प्रशिक्षणा दरम्यानचे मित्र आयपीएस अनमोल मित्तल यांना उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या