राज्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आता राज्यातील नगर पालिकांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडून त्यांमध्ये होणारा भ्रष्टाचार बंद करण्यासाठी "धोबीघाट" सुरू केलाय की काय असे वाटायला लागले आहे.जळगाव जामोद येथील मुख्याधिकारी "गळाला लावल्या"नंतर दुसऱ्याच दिवशी हिवाळी अधिवेशनात अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील गावंडे नामक मुख्याधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेला आला आणि लगेच यवतमाळ नगर पालिकेच्या तीन अधिकारी, कर्मचाऱ्यांना एसीबीने लाच घेत असतांना रंगेहाथ अटक केल्याने विदर्भातील नगर पालिकांमध्ये होत असलेला भ्रष्टाचाराचा विषय चांगलाच "ऐरणीवर" आलेला आहे.




0 टिप्पण्या