थोडा थोडका नव्हे तर तब्बल दोन लाख रुपये पगार देखील शासकीय अधिकाऱ्यांना कमी पडत असून वरकमाई साठी चटावलेले काही अधिकारी सरकारी कार्यालये आणि खुर्चीला आपल्या बापजादयांची जागीर समजून पदाचा दुरुपयोग करून हारामाचा पैसा कमावण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात.
आज असाच एक नगर पालिकेत मुख्याधिकारी या पदावर कार्यरत असलेला अधिकारी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या शहरात बुलढाणा एसीबीच्या जाळ्यात अडकला असून त्याला व त्याच्या साथीदाराला रंगेहाथ लाचेची रक्कम घेतांना पकडल्यावर मात्र "छटाकभर" रुमालाने तोंड झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होता.
जळगाव नगर पालिकेत मुख्याधिकारी या पदावर असलेला आकाश अविनाश डोईफोडे व
नगर पालिकेच्या विद्युत विभागातील सुपरवायजर दिपक कैलास शेळके अशी या दोन लाचखोरांची नावे आहेत.
जळगाव जामोद ता.जळगाव जामोद जि. बुलडाणा येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात दिलेल्या तक्रारीनुसार यातील तक्रारदार यांचे कंपनीने नगरपरिषद जळगाव जामोद यांनी दिलेल्या आदेशावरून केलेल्या पथदिव्यांच्या देखभाल दुरूस्तीच्या कामाचे माहे जुलै,ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांचे बिल तसेच तक्रारदार यांनी स्वतः केलेल्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून यातील लोकसेवक क्र.२) दीपक शेळके याने स्वतः साठी ६००० रुपये व आरोपी लोकसेवक क्र.१)आकाश डोईफोडे याच्यासाठी ६००० रुपये असे एकूण १२,००० रुपये लाचेची मागणी केली.डोईफोडे याची पडताळणी केली असता त्याने लाच रक्कम स्विकारण्यास संमती देवून लाच रक्कम आलोसे क्र.२ याचेकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची सत्यता पडताळणी केली असता उपरोक्त दोन्ही आरोपींनी लाच मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने आज दि.१३/१२/२०२३ रोजी सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती.त्यादरम्यान १२,००० रुपये लाच रक्कम दीपक शेळके याला नगर पालिका कार्यालयातच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे. दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेतले आहे.
जळगाव जामोद नगर पालिकेत मुख्याधिकारी असलेल्या आकाश अविनाश डोईफोडे,वय ३२ वर्षे,पद-मुख्याधिकारी,(वर्ग-२) नगरपरिषद, जळगाव(जामोद),ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा रा.मोहरी ता. पाथर्डी,जि.अहमदनगर व दिपक कैलास शेळके, वय-३० वर्षे,पद- विद्युत पर्यवेक्षक,(वर्ग ३) नगर परिषद, जळगाव जामोद, जि. बुलढाणा रा.उबाळखेड, ता.मोताळा, जि.बुलढाणा. या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई बुलढाणा एसीबीच्या पो.उपअधिक्षक श्रीमती शितल घोगरे,पो.नि.सचिन इंगळे, पो.नि.महेश भोसले व सापळा पथकातील स.फौ.शाम भांगे, पोहेकॉ.विलास साखरे,प्रवीण बैरागी,रवी दळवी,पो .ना. जगदीश पवार,विनोद लोखंडे,पोकाॅ.शैलेश सोनवणे,म.पो.कॉ.स्वाती वाणी आणि चालक पोना.नितीन शेटे, पोकाॅ.अरशद शेख लाप्रवि बुलढाणा यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


0 टिप्पण्या