महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर कार्यरत असलेले
अध्यक्ष न्या.आनंद वसंत निर्गुडे आणि सदस्य प्रा.संजीव सोनवणे,प्रा.लक्ष्मण हाके, व ऍड.बालाजी किल्लारीकर यांनी आपल्या पदांचे दिलेले राजीनामे राज्य शासनाने मंजूर केले आहेत.
त्यामुळे रिक्त झालेल्या आयोगाच्या नवीन अध्यक्ष व सदस्यांची आज नियुक्ती करण्यात आली असून तशी विधिवत घोषणा करण्यात आली आहे.अध्यक्ष आणि ३ नव्या सदस्यांच्या नियुक्तीचा आदेश आजच जारी करण्यात आला आहे.तसे राज्याच्या राजपत्रात देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
न्या.सुनील शुक्रे - अध्यक्ष
प्रा.मच्छिंद्रनाथ मल्हारी तांबे - सदस्य
डॅा.मारूती शिकारे - सदस्य
डॅा.ओमप्रकाश जाधव - सदस्य,अशी अध्यक्ष व सदस्यांची नावे आहेत.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची रचना व आयोगाची कार्यपद्धती.












0 टिप्पण्या