विज वितरण कंपनीचा सचिन मुंडे अकोला एसीबीच्या जाळ्यात अडकला....




    अकोला शहरात आज म.रा.विद्युत वितरण कंपनीचा कनिष्ठ सहायक सचिन मुंडे १००० रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ अकोला एसीबीच्या जाळ्यात अडकला असून त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे विद्युत वितरण कंपनीत एकच खळबळ उडाली आहे.

अकोल्यातील तक्रारकर्त्याने एसीबीला दिलेल्या तक्रारीनुसार ते सोलर रूफटॉप बसवून देण्याचे काम करीत असून त्यांनी एका ग्राहकांकडे रूफटॉप बसवुन दिल्यावर त्याची ऑनलाइन रिप्लेसमेंटची नोंद महावितरण कंपनीच्या साईटवर ऑनलाईन करणे आवश्यक असते.अशीच त्या ग्राहकाकडे रुफटॉप बसविल्यानंतर सदरची रिप्लेसमेंट नोंद करण्यासाठी सचिन भाऊराव मुंडे,वय ३७ वर्षे, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक, नेमणूक तक्रार निवारण केंद्र क्रमांक ११,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय,उपविभाग क्रमांक.२ अकोला वर्ग ४,रा.गजानन नगर डाबकी रोड, अकोला याने तक्रारदार यांना १००० रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबतची तक्रार दि.२५/८/२०२३ रोजी एसीबी अकोला यांना केली होती.प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज दि. ४/८/२०२३ रोजी पडताळणी करण्यात आली असता सचिन भाऊराव मुंडे याने तक्रारकर्त्याना १००० रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर लगेच सापळा कारवाई आयोजित करण्यात आली असता कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक सचिन मुंडे याला पंचांसमक्ष १००० रुपये लाच स्वीकारत असताना लाच रकमेसह रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले असून लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      ही कारवाई अकोला एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनात सापळा व तपास अधिकारी नरेंद्र खैरनार, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.अकोला यांचे नेतृत्वात कारवाई पथकातील पोलीस अंमलदार राहुल इंगळे,किशोर पवार,प्रदीप गावंडे, श्रीकृष्ण पळसपगार, निलेश शेगोकार व संदीप ताले यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या