राज्यातील संपूर्ण प्रशासन,राज्य सरकार व महसूल विभाग राज्यातील जनतेला सोबत घेऊन "महसूल सप्ताह" साजरा करीत असतांनाच नाशिक विभागातील नाशिक शहरातच कार्यरत तहसीलदार नरेश बहिराम याने तब्बल १५,००,०००( १५ लाख ) रुपयांची लाच घेऊन महसूल विभागाच्या "तोंडाला काळे फासून" महसूल सप्ताह अनोख्या पद्धतीने साजरा केला.खरोखर महसूल विभागात नेमके काम कसे चालते याचे जे आहे व वर्षभर चालते त्या सत्यतेचे दर्शन घडविले आहे.अर्थात हा "महामेरू" गावरान भाषेत "महाबेरू" अधिकारी ही लाच घेत असतांना रंगेहाथ एसीबीच्या हाती सापडला ही त्या बेशरम अधिकाऱ्यासाठी दुर्दैवाची बाब आहे.
राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील एका जमिनीच्या मालकाने त्यांच्या शेतात अवैधरित्या गौणखनिज उत्खनन केल्याबद्दल त्यांना मुरुम उत्खननाचे शासकीय शुल्क,आणि त्यावर नियमानुसार पाचपट दंड,गौणखनिजाची रॉयल्टी व जागा भाडे असे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२० रुपये याप्रमाणे दंड आकारणी करण्याचे तहसीलदार नाशिक यांनी आदेश काढले होते.त्या आदेशा विरुद्ध जमिनीच्या वयस्क मालक यांनी उपविभागीय अधिकारी,नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन एसडीओ नाशिक यांनी सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेश तुकाराम बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सदर शेतातून उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे बयाणात नमूद केले होते. सदर बाबत पडताळणी करणे कामी आरोपी लोकसेवक यांनी जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते.परंतु शेतजमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याने व त्या आरोपी लोकसेवक,तहसीलदार बहिरम यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटल्या असता नरेश बहिरम त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती १५ लाख रुपये लाचेची मागणी केली.सदरची बाब यातील तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीतील लाच मागणीची पडताळणी केली असता पंचांसमक्ष मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. यावरून सापळा कारवाई आयोजित केली असता मागणी केलेली लाचेची रक्कम आज दि. ०५/०८/२०२३ रोजी पंच यांच्या समक्ष स्वीकारत असताना आरोपी लोकसेवक, तहसिलदर यांना रंगेहाथ पकडून त्याच्याकडून १५,००,००० /- रुपये ( पंधरा लाख रुपये )
जप्त करण्यात आले आहेत.
आरोपी लाचखोर तहसीलदार नरेश तुकाराम बहिरम यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सापळा अधिकारी
संदीप घुगे,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्या पथकातील
पो.ना.गणेश निबाळकर,पो.ना.प्रकाश महाजन,पो.शि.नितीन नेटारे यांनी पार पाडली आहे.



0 टिप्पण्या