कोणत्याही गोष्टीची लालसा ही वाईटच असते,मग ती पैशांची असो वा आणखी इतर कशाची.याच लालसेपायी कित्येक कुटुंबे रस्त्यावर आली असून अनेकांना आपल्या चांगल्या नोकऱ्यांवर अर्ध्यातच पाणी सोडावे लागल्याची असंख्य उदाहरणे नजरेपुढे आहेत.
याच लालसेपोटी कितीतरी अधिकारी व कर्मचारी अगदी दररोजच एसीबीच्या तावडीत सापडून आपल्या सुरळीत आयुष्याचे वाटोळे करून घेत असल्याचे दिसून येत आहे.आज राज्यात असा एकही दिवस खाली जात नाही की त्यादिवशी कुणी एसीबीच्या तावडीत सापडले नाही म्हणून. कुठे ना कुठे, एक ना एक तरी कर्मचारी वा अधिकारी लाच घेतांना सापडतच आहेत.त्यांना शासन पगार कमी देते असेही काहीच नाही तर वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याला देखील पाच आकडी पगार मिळतो.तरी एव्हढी लालूच हे लोक का करतात हा एक फार मोठा प्रश्न आहे.
अगदी काल परवाच मुंबईचा एक पोलीस शिपाई असाच एसीबीच्या सापाळ्यात अडकला असून त्याने एका बांधकाम व्यावसायिकाला थोडी थोडकी नव्हे तर चक्क २० लाखा रुपयांच्या लाचेची मागणी केली आहे. आणि ती रक्कम न स्वीकारताही एसीबीच्या कारवाईत अडकून आपली आयुष्यभराची रोजीरोटी देणारी नोकरीच त्याने पणाला लावली आहे.आणि १५ दिवसांसाठी जेलात गेला ते व समाजात आणि नातेवाईकांत झालेली बदनामी ही बोनसच म्हणावे लागेल.
सदरहू प्रकरणाची हकीकत अशी की,या प्रकरणातील तक्रारकर्ता फिरोज उस्मान टिनवाला रा. पेडर रोड,मुंबई यांची मयूर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने बांधकाम व्यवसायाची फर्म आहे.या फर्मद्वारे आदर्शनगर विकास सोसायटी, आर.ए.के.मार्ग वडाळा प. मुंबई येथिल झोपाडपट्टी विकसित करण्याचे काम सुरू होते. याठिकाणी फर्मने केलेल्या बांधकामाचे ठिकाणी राहत असलेल्या बेकायदेशीर रहिवासी यांना बाहेर काढण्याकरिता तहसीलदार एस.आर.ए. मुंबई यांनी आदेश पारित केले होते व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश झाले होते. त्याअनुषंगाने टिनवाला हे आर.ए.के.मार्ग पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक निंबाळकर,पो.शी.महेश तसेच पो.शी.बक्कल नं.०९३३३५ भोपळे यांना भेटले व त्यांना तक्रारदार टिनवाला यांनी सदर ठिकाणी सोसायटीच्या बांधकामासाठी आलेली पाच तर सहा कामगार कुटुंबे व कंत्राटदार राहत असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलीस शिपाई मंगेश भोपळे यांनी मोबाईलद्वारे तक्रारकर्ता यांचेशी दि.५/७/२०२३ रोजी सांपर्क साधून एस.आर.ए.च्या अधिकारी यांना वीस ते पंचविस दिवस उशिरा पोलीस बंदोबस्त पुरविण्यासाठी २०,००,००० ( वीस लाख रुपये ) रुपये लाचेची मागणी केली.मात्र तक्रारकर्ता टिनवाला यांना ही रक्कम द्यावयाची नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांचेकडे दि.५/७/२०२३ लाच लाच मागणी प्रकरणी कारवाई होणेसाठी तक्रार दिली.
तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीची मुंबई एसीबीचे पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला यांनी चौकशी करून पडताळणी केली असता पो.शी.मंगेश नाना भोपळे, बक्कल नं ०९३३३५ नेमणूक आर.ए.के.मार्ग पोलीस स्टेशन याने पोलीस बंदोबस्त उशिरा पुरविण्यासाठी २०,००,००० (वीस लाख रुपये ) रुपयांची लाच मागणी केल्याचे खरे आढळून आले.यावरून एसीबीचे पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला यांनी तक्रारकर्त्याच्या फिर्यादीवरून आर.ए.के.मार्ग पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई मंगेश भोपळे याच्याविरुद्ध गु.र.न.२६/२०२३ कलम ७ ( अ ) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई नितीन दळवी,सहा.पोलीस आयुक्त,(प्रशासन) एसीबी मुंबई यांच्या मार्गदर्शनात पो.नि.शहानवाज मुल्ला यांनी केली आहे.


0 टिप्पण्या