अंधाधुंद गोळीबार, भाजयुमो उपाध्यक्षाची पत्नी जागीच ठार...



पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा येथे काल रात्री आठ वाजताच्या दरम्यान झालेल्या अंधाधुंद गोळीबारात जिल्हा भारतीय युवा मोर्चाच्या उपाध्यक्षांच्या पत्नीला गोळी लागून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असतांनाच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राजुरा शहरात रविवारी रात्री आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एका लाला नामक व्यक्तीचा पाठलाग करीत असताना तो सोमनाथपुरा भागातील सचिन डोहे यांच्या घरात स्वतःच्या बचावासाठी घुसला असता त्यावर अंधाधुंद गोळीबार केला.बाहेर कशाचा आवाज येत आहे हे पाहण्यासाठी सचिन डोहें यांच्या पत्नी पूर्वशा ह्या घराबाहेर आल्या असता आरोपीने केलेल्या या गोळीबारात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीला दोन गोळ्या लागल्या. यातील एक गोळी थेट छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान गोळीबाराच्या ह्या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

   या गोळीबारात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा सचिन डोहे,वय २७ यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर लाला नामक ज्यावर हा गोळीबार करण्यात आला तो  जखमी झाला आहे.जखमीला लाला याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

    करण्यात आलेला हा अंधाधुंद गोळीबार नेमका कोणत्या कारणासाठी झाला यावर शहरात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.चंद्रपूर पोलीस आरोपीचा कसून शोध घेत असून तो सापडल्यावरच गोळीबाराच्या मागील खऱ्या कारणांचा उलगडा होईल. 

  सदरची दुर्दैवी घटना घडली तेव्हा सचिन डोहे हे त्यांचे माजी नगर सेवक असलेल्या काकांसोबत कुठेतरी बाहेर गेलेले होते.पूर्वशा यांच्या मृत्यूमुळे शहरात घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर   पोलीस प्रशासनाला नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या