महाराष्ट्र् पोलिस दलात विदर्भातील अमरावती पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या भारत गायकवाड यांनी दि.रविवार २३/७/२०२३ च्या रात्री त्यांची पत्नी मोनी गायकवाड वय ४४ व पुतण्या वय ३५ यांच्यावर स्वतःच्या परवाना असलेल्या रिवालव्हर मधून अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या त्यांचा खून केल्यावर त्याच ठिकाणी स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखदायक घटना घडल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.केली.
पुणे शहरातील बालेवाडी परिसरात आज सोमवार २४ जुलैच्या पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.आत्महत्या केलेले पोलीस अधिकारी भारत शेका गायकवाड हे दीड वर्षापूर्वीच अमरावती पोलीस आयुक्तालयात बदलीवर आले होते. पत्नी मोनी गायकवाड ह्या दोन मुलांसह पुण्यातील बालेवाडी परिसरात राहत होत्या तर पुतण्या दीपक गायकवाड हा त्यांच्याकडेच रहात असल्याची माहिती मिळत आहे.तर भारत गायकवाड हे अमरावती येथुन दर शनिवारी आणि रविवारी आपल्या पुण्यातील बालेवाडी परिसरातील घरी येत असत.
भारत गायकवाड हे शनिवारी सुट्टीवर पुण्यात घरी आले होते,दोन दिवस परिवारात सोबत राहिल्यानंतर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अशी काय घटना घडली की त्यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत आयुष्य संपवले.याचा तपास पुणे पोलीस करीत आहेत.
भारत गायकवाड यांनी इतके टोकाचे पाऊल उचलण्या मागच्या कारणांची बारीक बारीक माहिती गोळा करण्यात येत असून पूर्ण तपासा अंतीच यातील गूढ बाहेर येईल.घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



0 टिप्पण्या