डीवायएसपी विपुल पाटील यांची जुगार अड्ड्यावर धाड, सहा आरोपींना अटक...





  अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार व परिविक्षाधीन डीवायएसपी विपुल पाटील यांनी आज आलेगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा आरोपींकडून जवळपास अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

   चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विपुल पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज सायंकाळच्या दरम्यान आलेगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा आरोपीना अटक केली आहे.अटक केलेल्यांमध्ये 
१) शेख मोबीन शेख मुसा, वय ३३ वर्ष
२) यावर खान सनाउल्ला खान, वय ३२ वर्ष
३) जफर खान सनाउल्ला खान, वय २९ वर्ष
४) अब्दुल अजहर जहिर, वय २६ वर्ष
५) सैजात खान इमदात खान, वय २३ वर्ष
६) मोहम्मद वसीम मोहम्मद फारुख,वय २३ वर्ष,सर्व रा.आलेगाव,ता. पातुर जिल्हा अकोला यांचा समावेश असून या आरोपींकडून नगदी २४,७६० रुपये, वेगवेगळ्या कंपनीचे सहा मोबाईल फोन,अंदाजे किंमत ७७,००० रुपये व दोन मोटरसायकली किंमत १,३५,००० रुपये असा एकूण मुद्देमाल २,३६,७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

   फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चान्नी पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक २०५/२०२३ कलम ४,५ महाराष्ट्र जुगार अधिनियम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 ही कारवाई परिविक्षाधिन डीवायएसपी विपुल पाटील,PSI गणेश महाजन सह NPC-१९३५, PC -२३०७पोलीस ठाणे चान्नी यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या