काल सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये नदीनाल्यांना महापूर आल्याने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका परिसरातील अनेक गावे पूराच्या पाण्याच्या वेढ्यात आलेली आहेत.
तेल्हारा तालुक्यात असलेल्या पाथर्डी या गावाला बाजूने वाहत असलेल्या नदीच्या महापुराने वेढा घातला असून हे गाव काल रात्रीपासून तालुका व जिल्ह्यातील प्रशासन व इतर संपर्का पासून "नॉट रीचेबल" झाले आहे.
या पुरात गावातील गुरेढोरे यांच्यासोबतच दोन व्यक्ती वाहून गेल्याची चर्चा असून प्रशासन मात्र अजूनही झोपेतच असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी केवळ बदली वरील चर्चा "सेंड ओफच्या" तयारीत असल्याने या गावातील दुर्दैवी नागरीकांना कोणतीही मदत करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे.
आत्ता कुठे १०.३० वाजताच्या दरम्यान रेस्क्यू टीम पाथर्डी येथे पोहोचली असून पुरात वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन व्यक्तींना सुखरूप बाहेर काढन्यात रेस्क्यू टीमला यश आल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी नुकतेच सांगितले आहे.त्यांची नावे राजू देठे व भारसाकळे असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित मदतकार्य तातडीने सुरू करण्यात येत आहे.
( दिवसभर आम्ही याच ठिकानी पाथर्डीच्या अपडेट देत राहू, पहात रहा, हीच बातमी )
***************
दुपारी २-३० वाजता
ब्रेकिंग पाथर्डी-
पाथर्डी येथील मामा भाचे अंकित संग्रामसिंग ठाकूर व बाला दिनेशसिंग ठाकूर हे शेतात रात्री रखवाली साठी गेले असता विदृपा नदीला आलेल्या पुरात वाहत गेले.यापैकी बाला ठाकूर अंदाजे वय १६ हा मुलगा पंचगव्हाण येथे वाहत गेला. तिथे तो सुखरूप पोहचून त्याने गावकऱ्यांना आपबीती सांगितली व घरी फोन लावून सुखरूप असल्याचे सांगितल्याचे.पंचगव्हान येथील गावकऱ्यांनी त्याला आपल्या वाहनाने घरी पोहोचवून दिले आहे,तर अंकित ठाकूरची अद्यापहि नदीकाठाणे पाहणी सुरू आहे.
************











0 टिप्पण्या