पोलीस ठाण्यात फुटलेले फटाके ठाणेदार अहिरे यांच्या अंगाशी आले..? अमरावती ग्रामिणला बदली...



   अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रशासकीय कारणास्तव बदली अकोल्यातील सिटी कोतवाली या पोलीस स्टेशनला केली होती.या बदली आदेशात जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती.परंतु अहिरे यांनी त्यांची अकोट शहर पोलीस स्टेशनला २ वर्षे पूर्ण झाली नाहीत म्हणून महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत करण्यात आलेल्या बदलीला स्थगिती मिळविली होती.वास्तविक पाहता त्यांची दोन वर्षे पूर्ण व्हायला फक्त दीड महिना अवकाश होता.या एक ते दीड महिन्यात बरेच हिंदू मुस्लिम समाजाचे सण येत असल्याने मध्येच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता बदली करणे शक्य झाले नसते,म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आधीच बदल्यांचे आदेश काढून सगळ्यांना आपापल्या ठिकाणी स्थानापन्न होऊन स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यामुळे अहिरे यांची मुदतीच्या काही दिवस आधी बदली करणे चुकीचे होते असे म्हणता येणार नाही.

      हे प्रकरण इतक्यावरच थांबले असते तर ठीक होते मात्र इकडे Mat Court मधून त्यांच्या बदलीला "स्टे" मिळताच त्यांच्या समर्थक कर्मचाऱ्यांनी व शहरातील काही परममित्रांनी अकोट शहर पोलीस स्टेशनच्या आवारात फटाके फोडून आनंद व्यक्त केल्याची बेकायदेशीर घटना घडली होती.हे फटाके फोडणे आता कुणा कुणाच्या अंगाशी येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल,एव्हढे मात्र निश्चित.कारण हे फटाके फोडणे म्हणजे सरळ सरळ एस.पी.संदीप घुगे यांनाच "ओपन चैलेंज" असल्याचे बोलले जात आहे.

    याच फटाके प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेऊन अकोटच्या डीवायएसपी रितू खोखर यांचेकडे चौकशी सोपविली आहे.गेल्या काही दिवसांपासून ही चौकशी सुरूच असून यामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांची बयाने नोंदविण्यात आली असून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत आहेत.

    Mat Court ने जरी बदलीला स्टे दिला असला तरी महिनाभराने काय ? अकोल्यात कोतवालीला रुजू झाल्याशिवाय त्यांचेकडे कोणताच पर्याय नव्हता.याचा विचार करून ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेकडे विनंती बदली साठी अर्ज केला होता.त्यानुसार त्यांच्या बदली अर्जाचा विचार करून त्यांना अमरावती ग्रामीणला देण्यात आले असून आजच तसे आदेश काढण्यात आले आहेत.

    याच विनंती बदली आदेशात अमरावती ग्रामिणला स्थानिक गुन्हे शाखेतून अवैध मानवी तस्करी विभागात बदली करण्यात आलेले तपन कोल्हे यांची अकोल्याला बदली करण्यात आली आहे तर यवतमाळचे गिरीश ताथोड यांची प्रकाश अहिरे यांच्यासोबत अमरावती ग्रामीणला बदली करण्यात आलेली आहे.

     Mat Court मधील प्रकाश अहिरे यांनी दाखल केलेले प्रकरण त्यांनी मागे घेतल्याशिवाय त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक अकोल्यातून मुक्त करू शकत नाहीत,कारण तसे केले तर तो न्यायालयाचा अवमान होतो. आता दोन दिवस सुट्टी येत असल्याने सोमवारीच हे न्यायालयीन प्रकरण मागे घेता येईल व त्यानंतरच ते अकोट शहर पोलीस स्टेशनच्या जबाबदारीतून मोकळे होतील.मात्र त्यांच्या बदलीला "स्टे" मिळाला म्हणून फटाके फोडणाऱ्यांचे कायदेशीर "वांदे" झाले तर त्यांचा "वाली" कोण...? याच गोष्टीची चर्चा संध्याकाळ पासून या कर्मचारी व मित्रांच्या "आस-पास" असलेल्या लोकांत सूरु होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या