राज्यात आजच्या घडीला काही पक्ष फोडून बनविलेले सरकार असून तीन तीन पक्षांच्या नेत्यांच्या नेतृत्वात राज्याचा कारभार चालविल्या जात आहे. शिवसेना फोडून एकनाथ शिंदे हे भाजपला सामील होऊन मुख्यमंत्री झालेत त्याला एक वर्ष होत नाही तोच शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून अजित पवार हेही भाजपला पाठिंबा देत सरकार मध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झालेत.
शिवसेना फोडून शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांना मंत्रिमंडळात घेण्याची अनेक आश्वासने गेल्या वर्षभरात दिलीत,मात्र गेल्या महिन्यात राष्ट्रवादी फोडून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री व इतर यांचेसह आलेल्या पैकी आठ आमदारांना मंत्रीपदे दिल्या गेलीत.यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदारांमध्ये धुसफूस सुरू होती.महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार असतांना अजित पवार हे अर्थमंत्री होते व ते विकास कामांसाठी निधी देत नाहीत या मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड ह्याच आमदारांनी केले होते.
मात्र आजच्या घडीलाही तेच अजित पवार हेच अर्थमंत्री असूनही अजित पवारांवर नाराजी व्यक्त करणाऱ्या त्याच आमदारांना मतदारसंघात विकास कामांसाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी ह्याच अजित पवार यांनी या अधिवेशनात मंजूर केला असून त्याबद्दल मात्र आत्ता भाजपच्या अंतर्गत गोटात नाराजी पसरली आहे.
राज्यातील शेतकरी सततची नापिकी,ओला दुष्काळ,पूर परिस्थिती व कोणतीही शासकीय मदत न मिळाल्याने हवालदिल झालेला आहे. राज्यातील शेतकरी वर्ग पार मेटाकुटीस आलेला असून त्या शेतकऱ्यांना मात्र मदत देण्यासाठी सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत याबद्दल राज्यभरात सरकार विषयी नाराजी पसरली आहे.
गेल्या कित्येक वर्षांत लोकप्रतिनिधींना इतक्या मोठ्या प्रमाणांत स्थानिक विकास कामांसाठी निधी कधीच दिल्या गेलेला नसतांना ह्या आमदारांना दिल्या जात असलेल्या निधीचे आकडे पाहून कुणाचेही डोळे विस्फारल्या शिवाय राहणार नाहीत.त्यामुळे ही सरकार वाचविण्यासाठी सरकारी खजिन्याची लूट तर नाही ना ?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
कोणत्या आमदाराला किती निधी?
१)प्रशांत बब, गंगापूर : ७४२ कोटी
२)जयंत पाटील, इस्लामपूर,वाळवा : ५८० कोटी
३)दत्ता भरणे, इंदापूर : ४३६ कोटी
४)राजेश टोपे, घनसावंगी : २९३ कोटी
५)मकरंद आबा पाटील , वाई : २९१ कोटी
६)रोहीत पवार, कर्जत जामखेड : २१० कोटी
७)भरत गोगावले, महाड : १३४ कोटी
८)उदय सिंह राजपूत, (ठाकरे गट) कन्नड : १२४ कोटी
९)किरण लहमाते, अकोले (अहमदनगर) : ११६ कोटी
१०)दिलीप वळसे पाटील, आंबेगाव : ९६ कोटी
११)अजित पवार, बारामती : ७३ कोटी
१२)विनोद निकोले, डहाणू : ७६ कोटी
१३)अब्दुल सत्तार, सिल्लोड : ५८ कोटी
१४)महेंद्र दळवी (शिंदे) अलिबाग : ४५ कोटी
१५)महेंद्र थोरवे, (शिंदे) कर्जत : ४८ कोटी
१६)अदिती तटकरे, श्रीवर्धन : ४० कोटी
१६)संदीप क्षीरसागर, बीड : ३५ कोटी
१७)माणिकराव कोकाटे, सिन्नर : ३३ कोटी
१८)छगन भुजबळ, येवला : ३१ कोटी
१९)संदीपन भूम्रे, पैठण : २९ कोटी
२०)महेश बाल्डी,(भाजप), उरण : २८ कोटी
२१)प्रकाश साळुंखे, (अजित पवार), गेवराई : १३ कोटी
२२)हसन मुश्रीफ, कागल : २२ कोटी
२३)धनंजय मुंडे, परळी : २१ कोटी
२४)संतोष बंगर, कलमनुरी : १९ कोटी.



0 टिप्पण्या