गाजीपुरच्या खदानीत टिप्पर कोसळून चालकाचा मृत्यू...



   अकोट तालुक्यातील पोपटखेड परिसरातील गाजीपुर येथील शेंडेच्या ६० ते ७० फुट खोल खदानीत टिप्पर कोसळले असून त्या दुर्दैवी घटनेत टिप्पर चालकाचा रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यातच मृत्यू झाला आहे.


    मुंडगाव तेल्हारा रस्त्याचे सुरू असलेल्या कामावर गौण खनिज वाहून नेणाऱ्या टिप्परचा हा अपघात दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान झालेला आहे.



  यातील गंभीर व बेशुद्धावस्थेत असलेल्या चालकाला अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले जात असतानाच रस्त्यातच मृत्यू झाला.सदर चालकाचे कृष्णा बिश्वास असे नाव असून  तो पश्चिम बंगाल मधील दत्तापाडा, हबिबपुर जिल्हा नाडीया येथील रहिवाशी तर अपघातग्रस्त टिप्पर हा सुधीर कंस्ट्रक्शन या कंपनीचा असल्याचे कळते.




     नुकतेच काही वेळापूर्वी आकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार IPS गुंजाळ हे पोलीस कर्मचार्यांसह ग्रामीण रुग्णालयात पोहोचले असून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवून गाजीपुर ह्या घटनास्थळी रवाना झाले आहेत.



   घटनास्थळाचे निरीक्षण करून पुढील तपास सुरू आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या