माजी खा.विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी ४ वर्षांची शिक्षा...




     राज्यसभेतील माजी खासदार विजय दर्डा यांना छत्तीसगडमधील कोळसा घोटाळा प्रकरणी ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.याच प्रकरणी त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लिमिटेडचे संचालक मनोज जयस्वाल यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर सेवा निवृत्त कोळसा सचिव, एच.सी.गुप्ता व इतर दोन अधिकारी के.एस.कोफ्रा व के.सी.समरिया यांना प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    दिल्लीतील विशेष न्यायालयाने छत्तीसगढ कोल ब्लॉक प्रकरणी ह्या शिक्षेची घोषणा केली आहे. कोळसा खाणींच्या वाटपात झालेल्या अनियमितते प्रकरणी संबंधित प्रकरणांत ही आज ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

    माजी खासदार विजय दर्डा हे राज्यातील लोकमत वृत्तपत्र समूहाचे संचालक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या