मायानगरी मुंबईतील महानगर पालिकेत दुय्यम अभियंता या पदावर किमान लाख रुपये महिना पगाराची नोकरी असूनही साध्या सफसफाईचे काम करणाऱ्या महिलांच्या बचत गटाच्या टेंडरच्या वर्क ऑर्डर साठी ६ हजार रुपये लाच मागणी करून ती स्वीकारणाऱ्या निर्वाण त्र्यंबकराव तेलगोटे याला मुंबई एसीबीच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
निर्वाण त्र्यंबकराव तेलगोटे वय ४१ वर्षे हा मुबई महानगर पालिकेच्या टी वॉर्ड मुलुंड येथील घनकचरा व्यवस्थापन विभागात दुय्यम अभियंता म्हणून नोकरीला असून या विभागात स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजने अंतर्गत १ जून २०२३ पासून पुढील सहा महिने पर्यंत टेंडर काढण्यात आले होते.सदर टेंडर प्रक्रियेतून तक्रारकर्त्याच्या पत्नीच्या संजीवनी बचत गटास मुलुंड विभागातील टेंडर मिळाले होते.
सदर टेंडर मिळाल्यावर या बचत गटाने १ जून पासून संबंधित विभागात सफाईचे काम सुरू केले होते.परंतु मनपाच्या टी विभाग मुलुंड कडून वर्क ऑर्डर देण्यात आली नव्हती.ती मिळाल्याशिवाय गटाला कामाचे बिल टाकता येत नव्हते. म्हणून दि.५/७/२०२३ला यातील फिर्यादी हे दुय्यम अभियंता निर्वाण तेलगोटे यांना भेटले होते.त्यांनी फिर्यादीला वर्क ऑर्डर देण्यासाठी ६ हजार रुपयांची मागणी केली, परंतु फिर्यादीला ही लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी दि.२५/७/२०२३ ला एसीबीच्या कार्यालयात याबाबत लेखी तक्रार दिली.
मुंबई एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी तक्रारीची पडताळणी केली असता तेलगोटे ह्याने पडताळणी दरम्यान ६ ऐवजी ४ हजार रुपयांवर तडजोड करून त्यानंतर लगेच आयोजित करण्यात आलेल्या सापळा कारवाईत निर्वाण तेलगोटे ह्याला फिर्यादी कडून पंचासमक्ष ४,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या