लोकल फंड ऑडिट डेप्युटी डायरेक्टर अर्थात स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाचा नांदेड जिल्ह्याचा उपसंचालक संतोष हणमंतराव कंदेवार, वय ४५ वर्ष, रा.कृष्णकुंज निवास,पाटबंधारे नगर,तरोडा बु.नांदेड हा वर्ग १ चा अधिकारी याला आज ६६ ग्राम पंचायतीचे लेखा परीक्षण करून देण्यासाठी आधी ७० हजार रुपये व पडताळणी दरम्यान ६० हजार रुपयांवर तडजोड करून काल मंगळवार दि.२५/७/२०२३ ला लाचेची रक्कम ६० हजार रुपये तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्वीकारत असतांना त्यास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई नांदेड एसीबीच्या पथकातील पोलीस निरीक्षक गजानन बोडके,पो.ना.राजेश राठोड,पो.कॉ.ईश्वर जाधव,सय्यद खादीर, चा.पो.ह.गजानन राऊत,मारोती सोनटक्के यांनी केली.



0 टिप्पण्या