अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात तीन तीन मंडळ अर्थात अर्ध्या तालुक्याचा मालक असल्याच्या तोऱ्यात सतत हवेत उडणाऱ्या मंडळ अधिकारी नीलकंठ नेमाडे कडील अकोलखेड व पणज ह्या दोन्ही मंडळांचा अतिरिक्त प्रभार काढून अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी नेमाडेचे पंख कतरले असल्याची अकोला जिल्ह्यातील महसूल विभागात खमंग चर्चा आहे.
अकोट तहसील कार्यालया अंतर्गत अकोलखेड मंडळात मंडळ अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या नीलकंठ नेमाडेला अकोट मंडळात दि.२२/५/२०२३ रोजी बदली केल्यावर अकोलखेड ह्या मंडळाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता तर पणज ह्या नेमाडेकडील मंडळाचा अतिरिक्त प्रभार साळवे यांच्याकडे देण्याचे आदेश दि.२४/५/२०२३ ला तहसीलदार अकोट यांनी काढले होते,परंतु दोन महिने होवूनही ह्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. तर अर्ध्या अकोट तालुक्याचा प्रभार नेमाडेकडे ठेवून कुणी कुणी काय काय साध्य केले वा कुणा कुणाचे हेतू साध्य झालेत हा महत्वाचा मुद्दा आहे.
नेमाडेने आपल्याकडे असलेल्या प्रभारांचा गैरफायदा घेऊन आपल्या शेताच्या रस्त्यावर अवैधरित्या गौण खनिज आणून टाकल्याबाबत तहसील कार्यालय व पणज मंडळात शंका कुशंका व्यक्त करण्यात येत होत्या.मात्र अकोटचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी याबाबत आजपर्यंतही कोणतीच कार्यवाही न केल्याने त्यांच्याही प्रमानिकते बद्दलही शंका व्यक्त करण्यात येत होत्या.
याबाबत विद्रोही मराठाने वेळोवेळी जिल्हाधिकारी यांचेकडे प्रभार काढून घेण्याबाबत व कारवाई होण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे.जिल्हाधिकारी अकोला यांनी बदलीवर जाण्याआधी दि.२१/७/२०२३ ला नेमाडेकडे असलेला प्रभार काढून आसेगाव मंडळाचे मंडळ अधिकारी सौदागर यांचेकडे देण्यासाठी दि.२५/७/२०२३ ला संबंधितांना तसे जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश दिले आहेत.
तर अकोलखेड येथील नेमाडे कडील अतिरिक्त प्रभार काढून घेऊन तो अकोला तहसील कार्यालयातुन अकोटला बदली करण्यात आलेल्या मंडळ अधिकारी सुनील राऊत ह्यांना सोपविण्यात आलेला आहे.अकोट तालुक्यातील गौण खनिजाचे माहेर घर अर्थात सोण्याच्या खाणीं नेमाडे कडून काढून घेण्यात आल्याने नेमाडेच्या पाठीराख्यांच्या पोटात दुखायला लागले असल्याची अकोट महसूल विभागात चांगलीच चर्चा आहे.तर आता काही अधिकाऱ्यांचा पोटमारा होणार असल्याने तेही नाराज आहेत.





0 टिप्पण्या