कचरा संकलनात लाच मागणाऱ्या आरोग्य निरीक्षक व अभियंत्याचा ठेकेदाराने वाजविला गेम...




    स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत घरोघरी जाऊन कचरा संकलन करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणाऱ्या ठेकेदाराला त्याची बिले काढण्याकरिता लाच मागणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगर परिषदेतील आरोग्य निरीक्षक व पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याचा आज अधिकृत कंत्राटदार दीपक उत्तराधी यांच्या स्थानिक माणसांनी "गेम" केला असून यवतमाळ एसीबीने पुरता "बँडबाजा" वाजविला आहे.

        स्वच्छ महाराष्ट्र अभियान कार्यक्रमा अंतर्गत नगर परिषद वणी,जिल्हा यवतमाळ येथील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचा वणी नगर परिषदचा कंत्राट अमरावती येथील दीपक उत्तराधी यांनी घेतलेला असून त्यावर योग्य प्रकारे देखरेख करून काम व्यवस्थित करून घेण्यासाठी त्यांनी स्थानिक पार्टनर ठेवलेला आहे.गेल्या काही दिवसांपासून याच स्थानिक पार्टनरला त्यांची दरमहा केलेल्या कामाची बिले काढण्याकरिता टक्केवारीची मागणी करण्यात येत होती. तक्रारदार पार्टनर वय ३४ वर्ष, रा.सानेगुरुजी नगर गेडाम लेआउट वणी ता.वणी जि.यवतमाळ यांचे सदर घन कचरा संकलनाचे जून महिन्याचे देयक काढून देण्याचा मोबदला म्हणून यवतमाळ नगर परिषदचे आरोग्य निरीक्षक जय आकाश उटवाल यांनी २०,००० रुपये व याच ठिकाणी कार्यरत पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शुभम तायडे हे दोघेही एप्रिल,मे व जून या तीन महिन्याचे देयक काढून देण्याकरिता ६०,००० रुपयांची मागणी करत असल्याबाबत तक्रार लाचलूचपत प्रतिबांधक विभाग यवतमाळ यांना दिली. सदरहू तक्रारीची यवतमाळ एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दि.२६/०७/२०२३ रोजी पडताळणी केली असता आलोसे क्र.१) जय अशोक उटवाल,वय ४४ वर्ष,आरोग्य निरीक्षक वर्ग ३,नगर परिषद वणी ता.वणी जिल्हा यवतमाळ रा.ह.मु.डॉ.सिद्दीकी यांचे,घरी साई,नगरी वणी ता.वणी जिल्हा यवतमाळ. मूळ पत्ता,नवल बाबा वार्ड पुसद.ता पुसद जि.यवतमाळ व २) शुभम अनंतराव तायडे,वय २६ वर्ष,पद,पाणी पुरवठा अभियंता नगर परिषद वणी (वर्ग - ३) ता.वणी जि.यवतमाळ यांना आज 
गजानन भोजनालय,साईमंदिर चौक,यवतमाळ रोड,याठिकाणी
लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले आहे.

   स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत अमरावती येथील दीपक उत्तराधी यांनी विदर्भातील बऱ्याच शहरांत कचरा संकलनाची कंत्राटे घेतली असून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी त्यांनी स्थानिक लोकांना पार्टनर महणून नियुक्त केले आहे.त्यांना बिले काढण्याकरिता विनाकारण त्रास देऊन कमिशनची मागणी होत स्थानिक अधिकाऱ्यांकडून होत असते.
    
    सदरहू सापळा कारवाई उत्तम नामवाडे, पोलीस उपअधीक्षक यवतमाळ घटक यांचे मार्गदर्शनातन सापळा व तपास अधिकारी,
अमित वानखडे पो.नि.यवतमाळ यांच्या नेतृत्त्वात कारवाई पथकातील,पो.नि.विनायक कारेगावकर, पो.अंमलदार अतुल मत्ते,अब्दुल वसीम,सुधीर कांबळे, राहुल गेडाम,सचिन भोयर,महेश वाकोडे,राकेश सावसाकडे,सुरज मेश्राम आणि चालक श्रेणी पो.उ. प.नी संजय कांबळे, सुधाकर कोकेवार यांनी यशस्वीरित्या पार पाडलीआहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या