४५ हजारांच्या लाचेच्या मोहात अडकला चक्क २.५ कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला भ्रष्ट अधिकारी...



   आसाममधील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. भूमी अभिलेख विभागात  अतिरिक्त संचालक पदावर कार्यरत असलेला लाचित कुमार दास याला ४५,००० रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने (ACB) रंगेहात अटक केली आहे.

   लाचित कुमार दास याने तक्रारदाराला १ लाख रुपयांच्या रकमेच्या लाचेची मागणी केली होती.पहिला हप्ता म्हणून ४५,००० रुपये स्वीकारताना त्याला जाळ्यात अडकवले गेले.मात्र, जेव्हा त्यांच्या घराची झडती घेण्यात आली, तेव्हा जे समोर आले ते पाहून तपास पथकही अवाक झाले.
घरातून तब्बल १.६६ कोटी रुपये रोख आणि ८६ लाख रुपयांच्या मुदत ठेवी (FD) सापडल्या. एकूण २.५ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती केवळ एका भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरी आढळली.

   उच्च पद, लक्षावधींचा पगार आणि सर्व शासकीय सोयीसुविधा असूनही, "साहेबांची" हाव संपता संपेना. ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीची गोष्ट आहे. अशा "महा" अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे काळाची गरज आहे, जेणेकरून जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास टिकून राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या