ऑपरेशन प्रहारची आहे जिल्ह्यात "सत्ता", तरीही खुलेआम चालतो अकोट ग्रामीणमध्ये "तीन पत्ता"...


   अकोला जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठमोठ्या कारवाया करून गुन्हेगारांना जेरीस आणत जिल्हा सोडायला भाग पाडले जात असतानाच ह्याच जिल्ह्यात अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत अगदी वर्दळीच्या अकोट अकोला रस्त्यावर असलेल्या धाब्याच्या मागे थोड्याशा आडोशाला बसून एक दोन नाहीत तब्बल ९ व्यक्ती शांततेने तीन पाणी परेल नामक जुगार खेळतात हे वाचूनच विचित्र वाटत आहे.

   आज दि.१९/१०/२०२५ रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक व पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथील स्टाफ पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, अकोट- अकोला रोडवरील हॉटेल सागवानच्या मागे काही ईसम तीन पानी परेल नावाचा जुगार खेळत आहे. ह्या  खात्रीलायक बातमीवरून सदरची माहिती सहायक पोलीस अधिक्षक निखील पाटील यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टॉफ व पंचासह जुगार रेड केली असता. एकुण ९ ईसम जुगार खेळतांना आढळून आल्याने पंचासमक्ष त्यांना नाव गाव विचारून अटक करण्यात आली आहे.

   सदरहू आरोपींकडून घटनास्थळावरून पंचासमक्ष ५२ पत्ते, नगदी २२,५०० रुपये, पाच मोटरसायकल किंमत अंदाजे १,६०,००० रुपये असा एकुण १,८२,५०० रुपयांचा ऐवज पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. 

    सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना आणि जिल्हा भरातील पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल घालून जनतेच्या संरक्षणासाठी सज्ज असून व कुठे काही होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकारी सतर्क असताना देखील एवढा मोठा जुगाराचा डाव अकोट ग्रामीण पोलिसांच्या नाकाखाली चालतो ही आश्चर्याची बाब आहे.अमरावती विभागातून उत्कृष्ट अधिकारी म्हणून नावलौकिक प्राप्त झालेले ठाणेदार किशोर जुनघरे हे नेमके कुठे कमी पडले हे मात्र सध्यातरी समजायला काहीच मार्ग नाही.

    रहदारीच्या रस्त्याच्या कडेला एव्हढ्या मोठ्या प्रमाणांत जुगाराचा फड चालत असताना ग्रामीण पोलिसांच्या खुफिया विभागाला ह्याची माहिती असू नये हा चिंतेचा विषय आहे. ह्याचाच दुसरा अर्थ असाही निघतो की ठाणेदारांचे आपल्या कर्मचाऱ्यांवर पाहीजे तसे नियंत्रण नाही.संबंधित बीट जमादार ह्यांच्या परवानगीने अथवा डी.बी. स्कॉटच्या संमतीने हे प्रकार चालत असावेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक ह्यांचे अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आणि सराईत लोकांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या आदेशाचे व्यवस्थित पालन केल्या जात नसावे.म्हणूनच एकाच ठिकाणी इतके मोठे लोक एकत्र येऊन जुगाराचा फड लावून खुल्या वातावरणात अगदी बिनधास्त जुगार खेळण्याची हिंमत करीत आहेत.

   अकोट उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक निखिल पाटील यांनी गुप्त चौकशी करून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी आजच्या ह्या कारवाईच्या निमित्ताने पुढे येत आहे.

   पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे ह्या जुगार खेळणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १) मुरलीधर खंडुजी खंडारे, २) विशाल सुधाकर रोडे ३) श्रीकृष्ण बळीराम गावंडे ४) मंगेश दिनकर गवळी ५) पुरुषोत्तम अरूण भाकरे ६) अजय किसन डोंगरे (७) नईमोददीन हसनोददीन ८)आकाश प्रभाकर ढोकणे, व ९) हरिष देविदास बोदडे अशी त्यांची नावे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या