अकोला पोलीस दलातर्फे "मिशन उडान" अंतर्गत "रन फॉर ड्रग्स फ्री इंडिया" मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन, तब्बल ५ हजार नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद...
अकोला पोलीसांच्या मिशन उडानने घेतली वक्तृत्वाची उंच भरारी...अंमली पदार्थ जागरूकता मोहीम अंतर्गत जिल्हास्तरीय आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा २०२५ संपन्न...
देशासमोरील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे ड्रग्जचा गैरवापर तसेच अंमलबजावणी आणि पुनर्वसन प्रयत्न महत्वाची भुमिका बजावत असतांना,जागरूकता वाढवुन धारणा बदलुन आणि समुदायांना कृती करण्यास सक्षम करून ड्रग्जचा गैरवापर रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे केंद्रीय गृहमंत्री यांचे निर्देशानुसार अंमली पदार्थाच्या धोक्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि अंमली पदार्थ नियंत्रणात आणण्यासाठी देशव्यापी अंमली पदार्थ जागरूकता मोहीम राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे मार्गदर्शना खाली "रन फॉर ड्रग्ज फी इंडीया" या अंमली पदार्थ जनजागृती मोहीमे अंतर्गत अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे ०३ की मी मॅरेथॉन चे आयोजन दि.१६.०८.२०२५ रोजी सकाळी ०६.३० वाजता पोलीस मुख्यालय अकोला या ठीकाणी करण्यात आले होते. मॅरेथॉन करीता अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, यांची विशेष उपस्थिती होती. जिल्हाधिकारी अजित कुंभार,संजय लहाने मनपा आयुक्त अकोला, यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरानी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात केली. मॅरेथॉनचा मार्ग पोलीस मुख्यालय, सरकारी बगीचा, जिल्हाधिकारी कार्यालय, अशोक वाटीका, सिंधी कॅम्प चौक, निमवाडी पोलीस लाईन, लक्झरी बस स्टॅण्ड व परत पोलीस मुख्यालयात येत येथेच समारोप झाला.सदरची मॅरेथॉन ही सर्वाकरीता खुली होती अकोला जिल्हयातील ०५ हजार नागरीकांनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग आपला सहभाग नोंदविला.
मॅरेथॉन दरम्यान सर्व मॅरेथॉन सदस्य यांचे जागोजागी करीता चिअर्स स्टेज लावण्यात आले होते.त्या ठिकाणी देशभक्तीपर गीत सादरीकरण करण्यात आले.या करीता अकोला जिल्ह्यातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.मॅरेथॉन संपल्यावर सर्व सहभागी स्पर्धांसाठी ज्याठिकाणी चहा नाश्त्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विध्यार्थी वर्गा सोबत संवाद साधत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. सोबतच अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही यासाठी त्यांचेकडून प्रतिज्ञा घेतली. सहभागी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक अशी "ड्रग्स फ्री इंडिया" या नावाची मानवी साखळी सादर केली. सदर मॅरेथॉन करीता अकोला शहरातील तसेच जिल्ह्यातील विध्यार्थी, पालक,शिक्षक, विविध एनजीओ, सामाजिक संघटना, यांनी आपापला सहभाग नोंदविला.
सादर कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलिस ठाण्यांचे ठाणेदार, पोलिस दलातील विविध शाखांचे प्रभारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड्स,तसेच अकोला जिल्ह्यातील बहुतेक शाळाचे विध्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदविला.
________________________________________
अकोला पोलीसांच्या "मिशन उडान"ने घेतली "वक्तृत्वाची उंच भरारी", अंमली पदार्थ विरोधी जागरूकता मोहीमेअंतर्गत जिल्हास्तरीय "आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा" २०२५ संपन्न...
अकोला पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभर अंमली पदार्थ विरोधी जागरूकता मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ ला सकाळी ९.०० वा. राणी कोठी, अकोला पोलीस लॉन, याठिकाणी शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विषयक जनजागृती करण्यासाठी जिल्हा स्तरीय,आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
१) अंमली पदार्थाची नशा करी जीवनाची दुर्दशा २) अंमली पदार्थांचे टाळू सेवन तेव्हाच होईल समृद्ध जीवन ३) अंमली पदार्थाचे मानवी जीवनावरील दुष्परिणाम ४) नको अंमली पदार्थांचा स्पर्श, तरच साधेल जीवनात उत्कर्ष ५) भारतीय तरुणाईला अंमली पदार्थांचा विळखाः कारणे आणि उपाय ६) अंमली पदार्थ नियंत्रणासाठी माझी भूमिका या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे अकोला जिल्ह्यातील शालेय स्तरावरआयोजन करण्यात आले होते.
जवळपास ४५ स्पर्धेकांनी यांत सहभाग घेतला होता. स्पर्धेचे निरीक्षक म्हूणन मेघराज गाडगे, स्वप्नील इंगोले, निकेश पाकधूने, रामेश्वर बरगड, सचिन माहोकार यांनी उत्स्फूर्तपणे कामकाज पाहिले. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके,यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
या स्पर्धेचा लगेच निकाल घोषित करण्यात आला असता त्यामध्ये वरिष्ठ गटातून प्रथम आदित्य टोळे, द्वितीय शेख उमायरा अन्सार अहमद, तृतीय कु.नारायणी अजय शास्त्री, कनिष्ठ गटातून प्रथम वत्सल डेहनकर, द्वितीय फातिमा आरुह मोहम्मद वसीम,तृतीय अन्यज्ञा आशिष सुरवाडे, तर प्रोत्साहनपर साक्षी कोकाटे, सोवरा,आशा अतुल अंधारे, यांना अपर पोलीस अधीक्षक यांचे हस्ते स्पर्धकांना बक्षिस व सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके, एपीआय गोपाल ढोले, पोउपनि. विष्णू बोडखे, पोहवा.संदीप तायडे, मपोकॉ. भारती ठाकूर, मपोकॉ.दीपाली यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी केले तर सदाबहार सूत्रसंचालन गोपाल मुकुंदे यांनी केले.

0 टिप्पण्या