तेल्हारा येथील तलाठी सहकाऱ्यासह एसीबीच्या जाळ्यात...



   अकोला जिल्ह्यातील अकोट महसूल उप विभागात तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड भाग २ मध्ये कार्यरत असलेला तलाठी त्याच्या खाजगी सहकाऱ्यांसह अकोला एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

    आताच थोड्या वेळापूर्वी विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार एका शेतकऱ्याकडून फेरफार नोंदीसाठी १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना विनोद आढे नामक तलाठी व त्याचा प्रमोद इंगळे नावाचा खाजगी सहकारी रंगेहाथ अकोला एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

   ह्या  लाचखोरांवर हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

   सदरहू कारवाई अकोला एसीबीचे उप अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात पो.नी.प्रवीण वेरुळकर, पोलिस अंमलदार संदीप ताले,अभय बावस्कर व अस्लम शहा यांनी यशस्वीरित्या पार पाडली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या