अमरावती पोलिस विभागात मोठे बदल झाले असून डीसीपी किरीथीका सीएम यांची आज नवीन आदेशानुसार नाशिकला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नागपूर ग्रामीणला अतिरिक्त पोलिस अधीक्षक असलेले रमेश धुमाळ आता अमरावती आयुक्तालयाचे नवीन पोलिस उपायुक्त (डीसीपी) असतील.
कालच अमरावती शहरात पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या किरीथीका सीएम यांची आज नवीन आदेशानुसार नाशिक शहरात बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी आता नागपूर ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ यांची अमरावती शहरात पोलिस उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्याच आदेशात इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.




0 टिप्पण्या