सासऱ्याने भावी सुनेला पळवून नेलं,आणि लग्न केलं...



    उत्तर प्रदेशांत गेल्या काही महिन्यांपासून कोरोना सारखी एखादी "प्रेमरोगा"ची साथ आली की काय अशी शंका यावी असे प्रकार वारंवार घडत आहेत.बरे हे प्रकार होणे ही "नैसर्गिक अवस्था" आहे परंतु जेव्हा असे प्रकार "नातेसंबंधा"त होतात तेव्हा त्याला काय म्हणावे.? जावई सासू,मुलीची सासू,अशा नाते संबंधात बायको,मुले व समाजाचा विचार न करता केवळ आपली "शरीराची आग विझविण्या"साठी   प्रेम होऊन पळून जाण्यापर्यंत ह्या "प्रेमपिसाटां"नी मजल मारली आहे.

    अशी एखादी घटना घडली असती तर त्याचा कुणी इतका विचारही केला नसता परंतु दर आठ दिवसांनी अगदी अव्याहतपणे असे प्रकार घडत असल्याने आता ह्याला काय म्हणावे हा एक फार मोठा प्रश्न पडला आहे.जन्मदात्या मायबापावरही विश्वास न ठेवण्यासारखी परिस्थिती ह्या लिंग पिसाटांनी निर्माण करून ठेवली आहे.असे काही न करताही "वासना शमविण्या"साठी ह्याच समाजात काही व्यवस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत, त्याठिकाणी जाऊन देखील ही आग विझविता आली असती.जेणेकरून नाते संबंधात तोंड मारून समाजात ह्या "नात्यांना बदनाम" करण्याचे "पाप" त्यांच्या हातून घडले नसते.


      गेल्या दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील रामपूरमध्येही अशीच एक प्रेमकथा पाहायला मिळाली. अलिगढ व गोंडा जिल्ह्यातील जुन्या घटनांची पुनरावृत्ती झाली असून एका व्यक्तीचे मुलाच्या होण्याऱ्या पत्नीवरच प्रेम जडले. त्यानंतर त्याने आपल्या होणाऱ्या सुनेलाच डॉक्टरकडे नेतो असे सांगून तिला पळवून नेले. यानंतर चार दिवसांनी जे काही घडले ते अगदी धक्कादायकच होते.

      एका मध्यमवयीन पुरुषाने त्याच्या मुलाचे लग्न ज्या मुलीशी लावले होते तिच्यावरच त्याचे प्रेम जडले.युपीतील रामपुरातील ही सुनही तिच्या भावी सासऱ्याच्या प्रेमात पडली आणि समाजाची, आपापल्या कुटुंबीयांची पर्वा न करता दोघेही पळून गेले. नंतर त्यांनी लग्न केले आणि घरी परतले. हे अनोखे लग्न आता संपूर्ण प्रदेशांत चर्चेचा विषय ठरले आहे. लोक या जोडप्याना नावे ठेवत आहेत पण ह्या नवविवाहित जोडप्याला कुणाचीही पर्वा नाही.काही दिवसांनी सासऱ्याने त्याच्या सुनेला लग्न करून बायको म्हणून घरी आणताच घरात जोरदार "लाथा-बुक्क्यांचा प्रसाद" त्याला मिळाला. त्यानंतर पंचायत झाली. आणि दोघांनाही घराबाहेर हाकलून लावण्यात आले.

      मिडियात फिरत असलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण ठाणे भोट परिसरातील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय ग्रामस्थाने आपल्या मुलाचे लग्न एक वर्षापूर्वी अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात पक्के केले होते. लग्नाची तारीखही एका महिन्यानंतर निश्चित झाली होती. लग्नानंतर वडील आपल्या मुलाच्या सासरी घरी येत राहिले. पण वडील आपल्या मुलाच्या सासरच्या घरी काय करत आहेत हे मात्र कोणालाही माहित नव्हते.

    आठ दिवसांपूर्वी नवरदेवाचे अर्थात मुलाचे वडील त्यांच्या होणाऱ्या सुनेच्या घरी गाडीने पोहोचले. ते म्हणाले, तुमची मुलगी खूप कमकुवत आहे. मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. जेव्हा दोघेही संध्याकाळपर्यंत परतले नाहीत तेव्हा वधूच्या कुटुंबाने तिच्या सासऱ्यांना फोन केला. सासऱ्यांनी सांगितले, सुनेला रुग्णालयात दाखल केले आहे.दोन दिवसांत तिला सुट्टी होईल.मात्र दोन दिवसांनंतरही मुलगी परत न आल्याने मुलीच्या कुटुंबाने पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी खरी हकिकत सांगितली.

       मग चार दिवसांनी असे काही घडले की सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकली. सर्वांनाच धक्का बसला.दरम्यान जन्मदात्या बापानेच मुलाच्या होणारु बायकोला पळवून नेल्याने मुलाचे दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यात आले.नंतर सुनेला पळवून नेत तिच्याशी लग्न  केल्यानंतर सासरे आपल्या नवविवाहीत पत्नीला घेऊन घरी परतले. दोघांना अशा प्रकारे एकत्र पाहून घरात अचानक गोंधळ उडाला. यादरम्यान वडील आणि मुलामध्ये जोरदार हाणामारी झाली. तर नवविवाहित वधूचे तिच्या भावी सासूशीही भांडण झाले. परिसरातील लोकांनी कसेतरी हे प्रकरण शांत केले. आणि संध्याकाळी पुन्हा पंचायत बसविण्यात आली.


      पत्नी आणि मुलाने नवविवाहित जोडप्याला गावातून हाकलून लावण्याचा आग्रह धरला. मुलगा आणि पत्नीचे वर्तन पाहून वडील आपल्या वधूसह घटनास्थळावरून निघून गेले. सध्या प्रेमी जोडप्याने शाहजहांनगर पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात आपले बस्तान ठोकले आहे. वडिलांचे मुलाच्या वधूशी लग्न हा  संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झालेला आहे. दुसरीकडे,मुलीने असे काही केल्याने समाजात चांगलीच बदनामी झाल्याने आणि मुलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी या संपूर्ण प्रकरणात शांतता बाळगत जे काही होईल त्याला सामोरे जाण्याचे ठरविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या