मायलेकी प्रथम श्रेणीत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण...



बिकट आर्थिक स्थिती, ग्रामीण भागात अपुऱ्या सोयी-सुविधा, कुटुंबाची जबाबदारी आदी विविध समस्यांमुळे अनेक महिला शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. मात्र आयुष्यातील तारेवरच्या कसरतीत अनेकांना शिक्षणाची आवड स्थिर करून जाते. हेच जाणून पुणे जिल्ह्यातील पिंपरीतील ३१ वर्षांच्या रीना कांबळे यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली आणि कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वयात शिक्षण पूर्ण करता येऊ शकते, हे रीना कांबळे यांनी दाखवून दिले आहे. २००९ साली लग्न झाल्यानंतर रीना कांबळे यांना कुटुंबाच्या जबाबदारीमुळे शिक्षण सोडावे लागले होते आणि पुन्हा शिकण्याची संधी मिळेल,असे त्यांना वाटलेही नव्हते. तेव्हाच "प्रथम एज्युकेशन फाउंडेशन" या संस्थेचा "सेकंड चान्स" हा उपक्रम त्यांच्यासाठी शिक्षणाचे दार पुन्हा उघडणारा ठरला आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा दिली.

   शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा येऊ पाहणाऱ्या सर्व महिलांच्या "स्वप्नांना बळ" देण्याचे काम "प्रथम एज्युकेशन फाउंडेशन" करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या