अमरावती शहरातील कॉटन ग्रीन कॉलनी येथे आपल्या अती व्यस्त कार्यक्रमातून विठ्ठल मंदिर संस्थान व रुख्मिणी महिला ग्रुपच्या संयुक्त कार्यक्रमाला वऱ्हाडी भाषेचे व्यंगकार भारत गणेशपुरे यांनी त्यांच्या बालमित्र बाळासाहेब देशमुख यांच्या आग्रहास्तव भेट दिली.
भारत गणेशपुरे यांनी सर्वांशी हितगुज केले. हा कार्यक्रम विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष घोरपडे काका व रुक्मिणी ग्रुपच्या अध्यक्षा सौ.सपना होले व उपाध्यक्ष सौ.मनीषा जुनघरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.दर्शना गावंडे यांनी केले.भारत गणेशपुरे यांनी आपल्या भाषणात हलक्या फुलक्या पद्धतीने सर्व मंडळींशी संवाद साधत कौटुंबिक हिंसाचाराचे वाढते प्रमाण व त्या संदर्भात आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन महिलांनी सर्व स्तरावर पुढाकार घेणे आज काळाची गरज आहे .हा महत्वाचा संदेश गणेशपुरे यांनी दिला.त्या संदर्भात प्रत्येक महिलांनी आपले कार्य, थोडा वेळ समाज हिता साठी द्यावा.असेही सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मनिषा जुनघरे,मयुरी राऊत,संगीता श्रीनाथ अतकरे, रश्मी काळे, सौ.अडगोकार,सौ.शुभांगी देशमुख, सौ.अनिता दहिलिंगे, सौ.कल्याणी जाधव,सौ.निंभोरकर सर्व रुक्मिणी महिला ग्रुपने सहकार्य दिले.




0 टिप्पण्या