अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे निलंबीत..?



   अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांना काल दिनांक २४ ला शासनाने तडकाफडकी निलंबित केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. याआधीही लोखंडे यांना गेल्या सहा महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले होते.मात्र केवळ सहाच तासांत शासनाने केलेले निलंबन आदेश मागे घेऊन विजय लोखंडे ह्यांना जीवन दान दिले होते.ह्यामागे नेमका कुणाचा वरदहस्त होता हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.
 
    विजय लोखंडे हे महसूल विभागात नोकरीवर लागले तेव्हापासूनच त्यांचा बहुतांश कार्यकाळ हा अकोला, अमरावती आणि बुलढाणा ह्या तीन जिल्ह्यातच गेलेला आहे. गुरूवार दि.२२ मे रोजी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातून निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.मात्र मागील वेळेप्रमाणे हेही आदेश मागे घेण्यात येतात की करण्यात आलेले निलंबन कायम ठेवल्या जाते ह्याविषयी साशंकताच असल्याने कुणीही खात्रीपूर्वक ह्या आदेशा विषयी सांगण्याची हिम्मत करीत नव्हते.

    अमरावती महानगर पालिका हद्दीतील अकृषक करण्यात आलेल्या शेतात नागरी रहिवासासाठी म्हणून रद्द केलेल्या लेआउटला परवानगी दिल्याबद्दल महसूल विभागाने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. गोपाळ नगर येथील रहिवासी संजय गव्हाळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई झाल्याचे समजते.

   मनपा हद्दीतील वडद परिसरातील दोन लेआउटची मान्यता तत्कालीन महानगर पालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिनांक २३ जून २०२३ रोजी रद्द केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधी १५ मार्च २०२४ रोजी दोन्ही लेआउटच्या मंजुरीसाठी महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक, नगररचना यांना अर्ज देण्यात आला होता. त्यासाठी तहसीलदार लोखंडे यांनी नाहरकत पत्र दिले होते. ह्याच नाहरकत पत्राच्या आधारे, दोन्ही लेआउट १९ मार्च २०२४ रोजी मंजूर करण्यात आले. नगररचना अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने नियमांना तिलांजली देत या लेआउटला दुसऱ्यांदा मान्यता दिली जी केवळ चारच दिवसांत रद्द करण्यात आली. याबाबत संजय गव्हाळे यांनी केलेल्या तक्रारीवरून तहसीलदार लोखंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र महानगरपालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यावर अद्याप पर्यंतही कोणतीही कारवाई झालेली नाही.


तहसीलदार विजय लोखंडे यांचा मनमानी कारभार...

   अमरावती मनपा हद्दीतील मोर्शी मार्गावरील रहाटगाव येथील सुभाष चौधरी यांनी नुकतेच तहसीलदार लोखंडे यांच्यावर आरोप केले होते. येथील स्मशानभूमीबाबत लोखंडे ह्यांनी पदाचा दुरुपयोग करीत बेकायदेशीर आदेश देण्यात आले होते.स्मशानभूमीच्या जमीनीबाबत दंडेश्वर संस्था यांच्यात वाद असूनही, लोखंडे यांनी एकतर्फी आणि मनमानी पद्धतीने हा आदेश दिला. आदेश देण्यापूर्वी नियमांचे पालन केल्या गेले नाही. तहसीलदारांनी आधीच अनेक प्रकरणांमध्ये संशयास्पद आदेश दिले आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या