अकोल्यात १६ किलो गांजासह ३ आरोपींना एलसीबीने केली अटक...



   स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या पथकाने अकोल्यातील रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या ह‌द्दीत तीन इसमाकडुन एकुण ३,२०,००० रुपये किंमतीचा १६ किलो गांजा जप्त केल्याने एकच खळबळ उडाली असून अकोल्या सारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याने ह्या शहरात हजारोंच्या संख्येत नशेडी अस्तित्वात असल्याचे पाहून डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.


   आज शुक्रवार दि.१६/०५/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि, पो.स्टे. रामदासपेठ,अकोला हद्दीत काही ईसम हे अंमलीपदार्थ गांजा विक्री करीता, रेल्वे स्टेशन येथुन मनपा सेमी इंग्रजी मुलांची व मुलीची वरीष्ठ प्राथमीक शाळा क्रमांक ७ चे समोर पाण्याची टाकी जवळ, रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या समोरून जाणार आहे.अशा खात्रीलायक माहितीवरून नाकाबंदी करून १) बादल लाला कांबळे २) सुनिल व्दारका प्रसाद यादव व ३) रोशन भास्कर सोनोने सर्व रा. कैलास टेकडी, खदान अकोला यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडील बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये एकुण १६ किलो गांजा किंमत अंदाजे ३,२०,००० रुपये  तसेच तिन्ही आरोपीचे ३ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल कि.अं. ३०,००० रुपये किंमतीचे असा एकुण ३,५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


   आरोपी विरूध्द एन.डी.पी.एस. ऍक्ट अन्वये कारवाई करून आरोपीना पुढील कारवाई साठी पो.स्टे. रामदासपेठ अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

     सदरहू कारवाई पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या नेतृत्वात  सपोनि.विजय चव्हाण,पोउपनि.गोपाल जाधव, पोउपनि.माजीद पठाण स्थानिक गुन्हे शाखा अकोला व सहा.पोलीस उपनिरिक्षक राजपालसिंह ठाकुर, पोलीस अमंलदार उमेश पराये, खुशाल नेमाडे, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर व चालक विनोद ठाकरे, अक्षय बोबडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या