अकोला झेडपीत "शायन्यांचाच" बाजार,अकलमंद गेलेत गधे चारायला...टेंडर खुलण्यापूर्वीच झाले काम सुरू...



   गेल्याच महिन्यात अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारंजा रमजानपूर शाळा खोली बांधकामात निकृष्ट दर्जाच्या बांधकामासाठी जबाबदार धरून ग्रामसेवक व शाखा अभियंत्याला चक्क "वेठीस धरून" त्यांच्यावर "हुकूमशाही" पद्धतीने निलंबनाची अयोग्य कारवाई करण्यात आली होती. 


     त्याच शाळा खोलीचे पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आले असून आता मात्र ह्या कामातून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी "आपली शाळा" भरविणे सुरु केले असल्याची बाब लक्षात येताच सगळ्यांचेच "धाबे दणाणले" आहे.


   कारंजा रमजानपूर गावातील शाळा खोली बांधकाम ग्रामपंचायत स्तरावर होत असून, या कामाची ई-निविदा प्रक्रिया २० मार्च रोजी राबविण्यात आली आहे. निविदा आज दिनांक २५ मार्च रोजी बंद होत असून,उद्या २६ मार्च रोजी ह्या कामांच्या निविदा उघडण्यात येतील, हे शाळा खोली बांधकाम "डीपिसी"च्या निधीतून जि.प.च्या बांधकाम विभागा मार्फत केल्या जात आहे.तर ह्या कामासाठी १४ लाख २१ हजार ६१६ रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.


    अकोला जिल्हा परिषदेत कार्यरत "राजा हरिश्चंद्राच्या वारसांना" गोरगरीब मुलांसाठी बसायला वर्गखोली नसल्याने ह्या कामाची इतकी "घाई झाली" आहे की त्यांनी ह्या कामाची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण न होऊ देता ह्या वर्ग खोलीचे बांधकाम सुरू केले आहे.आजरोजी हे काम बरेच म्हणजे जमिनीच्या वर "जोत्या"पर्यंत वर आले आहे.


    मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सदरहू कामाची  ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच शाळा खोलीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या शाळा वर्ग खोली बांधकामाची "प्लिंथ" तयार झाल्याचे फोटो हे ह्याचे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे या कामाचा कंत्राटदार कोण आहे.?कुणाला हे काम देण्यात आले.? कार्यारंभ आदेश कुणाला.? जारी करण्यात आले ह्या सर्व बाबी अजूनही "डब्ब्या"तच आहेत.


     ह्याच बेकायदेशीर रित्या करण्यात येत असलेल्या कामात दोन महिन्यां पूर्वी ग्रामसेवक व कनिष्ठ अभियंता यांना "बळीचा बकरा" बनवून निलंबीत केल्या गेल्याचे प्रकरण घडले असून, याच कामामध्ये तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता प्रकाश इंगळेला देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी "घरची वाट" दाखविली होती.प्रभारी कार्यकारी अभियंता इंगळेच्या "चुकीचे प्रायश्चित्त" मात्र ग्रामसेवक व शाखा अभियंता यांना घ्यावे लागले होते.तर आताही बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रकाश उमाळे "त्याच मार्गा"ने जात असून हे प्रकरण पुन्हा "वादाच्या भोवऱ्या"त सापडले आहे. हे प्रकरण आता "कुणाच्या अंगावर" ढकलल्या जाते हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.शेवटी अकोला झेडपीत "शायन्यांचाच" बाजार,आणि "अकलमंद" गेलेत गधे चारायला...असे म्हणण्याची वेळ आली आहे.

     कामाचे टेंडर होवून "वर्क ऑर्डर" होण्याच्या आधीच ले-आउट टाकून "प्लिंथ लेव्हल" पर्यंत हे काम कुणी केले.? ही मात्र आश्चर्याची बाब आहे.ह्या निमित्ताने अकोला जिल्हा परिषद बांधकाम  विभागाचा "रामभरोसे कारभार" चव्हाट्यावर आला असून ह्या विभागात कोणत्या "पद्धती"ने कामे केल्या जातात याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. 

     या कामात नेमके काय दडले आहे.? की केलेले काम "भुईसपाट करून" त्यासाठी ग्रामसेवक व शाखा अभियंत्याला "जबरदस्तीने जबाबदार" धरून निलंबित करण्यात आले. यासाठी तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता प्रकाश इंगळे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ठमके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांची चक्क "दिशाभूल" करीत ह्या दोघांचे निलंबन देखील घडवून आणले. आणि पुन्हा त्याच पद्धतीने "टेंडर प्रक्रिया" पूर्ण न होऊ देता ह्या शाळा खोलीचे बांधकाम घाईघाईने सुरू केले आहे.


     ह्यात बाळापूर बांधकाम विभागाचे उपअभियंता किशोर ठेंग यांचा तर काही उद्देश नाही ना.? अथवा त्यांना ह्या अवैधरीत्या केलेल्या किंवा होत असलेल्या कामासाठी जबाबदार धरून त्यांना तर "टार्गेट" करून निलंबित करण्याचा तर कुणाचा "डाव नाही ना".? अशी शंका घेण्यास सुद्धा बराच वाव आहे.
 
     उपअभियंता ठेंग यांना गोत्यात आणले जाईल का? यासाठी काही  अधिकारी तर  "खेळी खेळत नामानिराळे" राहत नसतील ना.? अशीही शंका जिल्हा परिषदेच्या वर्तुळात व्यक्त  केल्या जात आहेत. अकोटमधील "चिरेबंदी दगडी भिंती"च्या आडून तर हे सर्व कारस्थान रचल्या जात नाही ना.? याचीही संबंधितांनी चौकशी करणे यानिमित्ताने गरजेचे झालेले आहे.कारण ह्या "खुन्नस बाज" गड्याने मार्चसाठी केलेल्या सर्वच मेहनतीवर पाणी फिरविल्या गेल्यामुळे त्याच्या चांगलीच "भोकावर आलेली" असल्याचे त्याच्याच जवळचे काही लोकं सांगत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या