मनमानीपणे "फेरफार रद्द" करून नागरिकांना त्रास देणारा मंडळ अधिकारी गणेश भारती,एसडीओच्या आदेशाने पडला "तोंडघशी"...


गेल्या काही महिन्यांपूर्वीच अकोट महसूल विभागात रुजू झालेल्या गणेश भारती नामक मंडळ अधिकाऱ्याने अकोट मंडळातील तलाठी व कामानिमित्त चकरा मारणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्रस्त करून सोडले असून शासनाने ह्या कर्मचाऱ्याची नेमणूक सर्वसामान्य जनतेच्या "सेवेसाठी" केली की त्यांना "त्रास देण्या"साठी हेच एक फार मोठे कोडे नागरिकांना पडले आहे.

   अकोट तालुका हा जिल्ह्यात एक सधन व मेहनती लोकांचा परिसर म्हणून ओळखल्या जातो.या परिसरातील लोकं मेहनत मजुरी करून तर काही आपापल्या हिशोबाने शेती,नोकरी करून दोन पैसे गाठीशी बांधून मुलाबाळांच्या भावी आयुष्यासाठी काही जमिनीचे तुकडे घेऊन ठेवत आहेत.ह्या रीतसर खरेदी केलेल्या प्लॉटच्या नोंदी सरकार दरबारी करून घेणे कायद्याने बंधनकारक असल्याने हे नागरिक तलाठ्यांच्या दफ्तरी नोंद करण्या साठी अर्ज देऊन सगळे सोपस्कार पार पडतात.

     मात्र अकोट शहरात नव्यानेच मंडळ अधिकारी म्हणून रुजू झालेल्या गणेश भारती नामक अडेलतट्टू अधिकाऱ्याने असेच सर्वसामान्य नागरिकांचे तलाठ्यांनी रीतसर व नियमानुसार घेतलेले फेरफार "रद्द करण्याचा सपाटा" लावला असून त्यामुळे अकोट शहरातील नागरिक अक्षरशः  वैतागले आहेत.

    अकोट शहरातील अशाच एका प्रकरणांत तलाठ्यांनी घेतलेला फेरफार या मंडल अधिकाऱ्याने काहीही कारण नसतांना रद्द केल्याने, व्यथित झालेल्या अर्जदाराने अकोटचे एसडीओ यांच्याकडे अपील दाखल केले होते.त्या अपिलावर सुनावणी घेऊन त्यांनी मंडळ अधिकारी गणेश भारतीवर ताशेरे ओढून रद्द केलेले "फेरफार नियमित" करून मंजूर करण्याचे आदेश देण्यात आल्याने अर्जदाराने समाधान व्यक्त केले आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या "अक्कल हुशारी"ने त्रस्त करून सोडणाऱ्या "अतिहुशार" मंडळ अधिकाऱ्याला चांगलीच "चपराक" बसली असल्याची अकोट तहसील कार्यालयात "चविष्ट चर्चा" आहे.

   अकोट शहरातील रहिवाशी असलेल्या

१) अब्दुल राजीक अब्दुल सत्तार रा.धारोळीवेस अकोट ता.अकोट जि.अकोला

२) अनिसोदिन करीमोदीन

रा.गोलबजार संसारपुरा अकोट ता.अकोट जि. अकोला व

३) शफिकोद्दीन करीमोद्दिन

रा.गोलबजार संसारपुरा अकोट ता.अकोट जि. अकोला ह्यांनी त्यांचे फेरफार अकोटचे मंडळ अधिकारी गणेश भारती यांनी रद्द केल्याने एसडीओ अकोट यांचेकडे आपली दखल केले होते.त्यामध्ये त्यांनी अकोटमधील तलाठी व मंडळ अधिकारी यांना पार्टी केले होते.याच प्रकरणात एसडीओ अकोट यांनी नुकतेच आदेश पारित करून रद्द केलेले फेरफार पुनश्च घेण्याचे आदेशित करण्यात आल्याने गणेश भारती यांची मात्र चांगलीच "नामुष्की" झाली आहे.

    १)मंडळ अधिकारी,अकोट ता.अकोट जि. अकोला व २) तलाठी,मौजे खानापुर त्र्यंबकपुर अकोट ता.अकोट जि.अकोला यांच्याविरुद्ध उपविभागीय अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये आदेश पारित (दिनांक ०४/०३/२०२५) करण्यात आलेला आहे.

   अपीलार्थी अर्जदार यांनी मौजे खानापुर त्र्यंबकपुर येथील गट नं.११२ क्षेत्र २.३२ है. आर बाबत घेण्यात आलेला फेरफार क्रं.४३५८ दि.२६.१०.२०२४ ने व्यथीत होवून महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये दाखल अपील अर्जा वरून सुरु करण्यात आले.अपीलार्थी यांच्या अपील अर्जातील थोडक्यात मुद्दे खालील प्रमाणे..

    १) मौजे खानापूर त्र्यंबकपुर ता.अकोट जि. अकोला शेत गट क्रं.११२ क्षेत्र २.३२ हे. आर पैकी अपीलार्थी क्रं.२ यांचे ताब्यातील व मालकीचे क्षेत्र १.०० आणि अपीलार्थी क्रं. ३ यांचे ताब्यातील व मालकीहक्काचा शेत ०.४७ हे. आर असे एकत्र १.४७ हे. आर शेतजमीन अपीलार्थी क्रं. १ यांनी दिनांक २४.०९.२०२४ रोजी कायदेशीररीत्या नोंदणीकृत खरेदी दस्त कं. ४७५६ खरेदी केले.

२) अपीलार्थी क्रं.१ च्या नावाने फेरफार नोंदणी करीता दि.०१.१०.२०२४ रोजी गैरअपीलार्थी क्रं.२ यांचेकडे अर्ज सादर केला. त्याच दिवशी गैरअपीलार्थी क्रं.२ यांनी अपीलार्थी क्रं.१ च्या नावाने प्रस्तावित फेरफार मंजुरी करीता गैरअपीलार्थी क्रं.१ कडे पाठविले.

३) दि.२६.१०.२०२४ रोजी गैरअपीलार्थी क्रं.१ यांने वरील नोंदणी अर्ज बाबत फेरफार शेरा मध्ये सदर फेरफार मध्ये तुकडे बंदी कायदयाने परवानगी वरिष्ठ अधिकारी यांचे दस्ता सोबत तलाठी यांनी सह सादर केला नाही.नोंद नामंजूर असा शेरा मारुन फेरफार नोंद नामंजूर केला. सदर खरेदीमुळे वरील शेताचे कोणतेही प्रकारचा तुकडे पडत नाही,क्षेत्र १.०० ०.४७ एकूण १.४७ हे.आर होते तर हे स्पष्ट दिसून येते की शेताचे तुकडे पडत नाही. दोघांचे शेत हिस्से एकमेकाने लागलेले असून एकाच शेत गटचा भाग आहे.

    सबब फेरफार क्रं.४३५८ न्याय हितदृष्टीने मंजूर करुन सर्व अपीलार्थी यांना न्याय दयावा. अपीलार्थी यांचे अपील मंजूर करून फेरफार क्रं. ४३५८ न्यायहित दृष्टीने मंजूर करण्यात यावा अशी विनंती अपीलार्थीने अपील अर्जात केली होती.

     ह्या प्रकरणात ग्राम महसुल अधिकारी मौजे खानापुर त्र्यंबकपुर यांचा दि. १७.०२.२०२५ रोजीचा अहवाल एसडीओ यांना प्राप्त प्राप्त झाला असुन, त्यानी मौजे खानापुर त्र्यंबकपुर येथील शेत स.नं. ११२ क्षेत्र २.३२ हे.आर. या क्षेत्र पैकी अनिसोट्टीन करीमोदीन यांचे नावे १.०० हे. आर शेतजमीन व शफीकोदीन करीमोदीन यांच्या नावे ०.४७ हे. आर शेतजमीन असुन या दोन्ही खातेदारानी दि. २४.०९.२०२४ रोजी खरेदी दस्त क्रं. ४७५६ नुसार खरेदी घेणार अब्दुल राजीक अब्दुल सत्तार यांनी वरील खातेदाराचे नावे असलेली शेतजमीन क्षेत्र ९.४७ हे. आर खरेदी केली असुन अर्जदार यांनी दिलेल्या अर्जा नुसार दि.०१.१०.२०२४ रोजी फेरफार क्रं. ४३५८ हा घेतला पंरतु मंडळ अधिकारी यांनी तुकडे बंदी कायदया बाबत दस्ता सोबत वरिष्ठ अधिकारी यांची परवानगी नसल्याची कारण देवून सदर फेरफार हा नामंजूर केला आहे. परंतु या मध्ये तुकडेबंदी कायदयाचे उल्लंघन झाल्याचे दिसुन येत नाही. असे तलाठी यांनी त्यांच्या अहवालात नमुद केले होते.

   एसडीओ अकोट यांनी अपीलार्थी यांचा अपील अर्ज, प्रकरणातील कागदपत्र व तलाठी यांचा अहवाल यांचे अवलोकन केले असता, त्यातील बऱ्याच बाबी त्यांच्या लक्षात आल्या असता त्यांनी आपल्या आदेशात देखील त्यांचा उल्लेख केला की,

१) मंडळ अधिकारी यांनी तुकडेबंदी कायदयातील तरतुदी बाबत कोणत्याही प्रकारची शहनिशा न करता फेरफार नामंजूर करणे हे कायदयाच्या दृष्टीने योग्य नाही.

२) तलाठी यांनी अहवालीत केले की, तुकडेबंदी कायदयाचे उल्लघंन झाल्याचे दिसुन येत नाही हि बाब तुकडेबंदी कायदयातील, तरतुदीनुसार बरोबर आहे..

३) मौजे खानापुर त्र्यंबकपुर येथील शेत स.नं. ११२ क्षेत्र २.३२ हे.आर. या क्षेत्र पैकी अपीलार्थी क्रं.२ अनिसोद्दीन करीमोदीन यांचे नावे १.०० हे. आर शेतजमीन व अपीलार्थी क्रं. ३ शफीकोट्टीन करीमोदीन यांच्या नावे ०.४७ हे. आर शेतजमीन असुन या दोन्ही खातेदारानी दि.२४.०९.२०२४ रोजी खरेदी दस्त क्रं. ४७५६ नुसार खरेदी घेणार अपीलार्थी क्रं.१अब्दुल राजीक अब्दुल सत्तार यांनी वरील खातेदाराचे नावे असलेली शेतजमीन क्षेत्र १.४७ हे. आर खरेदी केली आहे. मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ आणि मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम १९५९ मधील नमुद तरतुदीचे उल्लघंन होत नसल्याने व खरेदी केलेल्या शेतजमीनचे एकत्रीकरण होत असल्याचे मंडळ अधिकारी यांनी फेरफार क्रं. ४३५८ हे नांमजूर करणे न्यायोचित नाही.

    वरीप्रमाणे सर्व बाबींचा विचार करून अकोटचे एसडीओ मनोज लोणारकर यांनी पुढील प्रमाणे आदेश पारित करून ते पुढील कारवाईसाठी तलाठी व अकोट शहराचे अष्टगंधधारी मंडळ अधिकारी गणेश भारती यांच्याकडे पाठविले आहेत.
१) अपीलार्थीचा अपील अर्ज मंजुर करण्यात येते.
२) मौजे खानापुर त्र्यंबकपुर येथील गट नं. ११२ बाबत मंडळ अधिकारी यांनी नांमजूर केलेला फेरफार हा मंजूर करुन प्रमाणीत करावा.
३) प्रकरणातील आदेशा विरुध्द अपील करावयाचे असल्यास ६० दिवसाच्या आत सक्षम न्यायालयाकडे अपील करण्याची कायदयाने तरतुद आहे.


    ह्याच अतिहुशार मंडळ अधिकार्याने अकोट शहरातील तलाठी यांनी मंजूर केलेले "शेकडो फेरफार रद्द" करून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना काहीही कारण नसताना स्वतःच्या "हेकेखोर" पणाने विनाकारण त्रस्त करून सोडलेले आहे.अकोट मधील तलाठ्यांनी घेतलेल्या "फेरफार रद्द" करण्याच्या प्रकरणांची एसडीओ मनोज लोणारकर यांनी "दफ्तर तपासणी" करून माहिती घेतल्यास ह्या "अष्टगंधधारी मंडळ" अधिकाऱ्याला "हिमालयात तपस्या" करण्यास नक्कीच पाठवतील यात तिळमात्रही शंका घेण्याचे कारण नाही.

    आजरोजी अकोटच्या एसडीओ यांच्याकडे हे एकच प्रकरण आले आहे परंतु अकोट मंडळात असे काहीही कारण नसताना "शेकड्याने फेरफार नामंजूर" करण्यात आले असून आम्ही त्यांची यादीच सोबत देत आहोत.एसडीओ मनोज लोणारकर यांनी त्यांचाही विचार करून संबंधित गोरगरीब लोकं "वकील लावून" त्यांच्याकडे अपील दाखल करू शकत नसल्याने त्या सर्व लोकांना "एकत्रितरित्या न्याय" देण्यात यावा अशी विनंती "विद्रोही मराठा"च्या माध्यमातून करण्यात येत आहे.

अकोट भाग : २



अकोट भाग : १

मोहाळा :

केमलापूर:

खानापूर :


जोगबन  :






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या