पक्षाचा जीव वाचविण्यासाठी युवकाचा जीव धोक्यात घालणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्यांना "राष्ट्रपती पदक" द्या...



    जालना शहरातील सिंधी बाजार चौकात ४० फूट उंचीच्या हायमास्ट पोलवर पतंगाच्या दोऱ्यात अडकलेल्या पक्षाचा जीव वाचविण्यासाठी महानगर पालिकेचे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी बोलावण्यात आले होते.मात्र ह्या अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा करीत तेथे उपस्थित असलेल्या एका युवकाला कोणतीही सुरक्षा साधने नसतानाही त्या पोल वर चढवून त्या पक्षाचा जीव वाचविला. त्याबद्दल ह्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होण्याऐवजी सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.ह्या युवकाचा पक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात जर इतक्या उंचावरून पडून जीव गेला असता तर त्याला कोण जबाबदार असते.? अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून आयुक्तांनी कारवाई केली असती काय अशाप्रकारच्या प्रश्नांची नागरिक प्रशासनावर सरबत्ती करीत आहेत.


  
जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ह्या युवकाने त्या अडकलेल्या पक्षाचा जीव वाचविण्यासाठी  ह्या अग्निशामक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून आपला जीव धोक्यात टाकला आणि कोणतीही सुरक्षा साधने न वापरता त्या ४० फूट उंच असलेल्या खांबावर चढून त्या पक्षाचा जीव वाचविला. सुदैवाने ह्यात त्या युवकाला काहीही झाले नाही परंतु त्यामुळे ह्या संबंधित अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य गुन्ह्याला माफ करता येणार नाही हेही तितकेच खरे.

    महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, त्यांच्याच आदेश आणि परवानगीने एका युवकाने पक्षाला ४० फूट उंच विजेच्या खांबावर चढून आपला जीव धोक्यात टाकत वाचविले आणि महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टी हे नुसते बघ्याची भूमिका घेत पाहत होते. त्या युवकाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने दिलेली नसताना सगळ्या समोर तो खांबावर चढला आणि अधिकारी अग्निशमन दलाचे माधव पानपट्टी, त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचारी यांनी त्याला रोखण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही,जर या मुलाच्या जीविताला कोणत्याही प्रकारची हानी होवून त्याची हात पाय जायबंदी झाले असते  तर याची जबाबदारी माधव पानपट्टे यांनी घेतली असती काय.? 

   जालना येथील सिंधी बाजार मधील एका ४० फूट उंच असलेल्या पोल वर चढलेल्या आणि आपला जीव धोक्यात घातलेल्या युवकाला काही असे करण्यापासून परावृत्त करण्याऐवजी त्याला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ काही कारवाई करणार की नाही असा शहरातील असंख्य नागरिक करीत आहेत.

   ह्यातील दुसरी बाजू अशी की हा युवक त्या खांबावर चढत असताना त्याठिकाणी उपस्थित असलेले कित्येक लोकं आपापल्या मोबाईल फोन मध्ये ह्या घटनेचे चित्रीकरण करीत होते.त्यानंतर ह्या युवकाचे अभिनंदन करणाऱ्या शेकडो पोस्ट शहरातील हजारो मोबाईलवर फिरत आलेले पहावयास मिळत होते. त्यामुळे त्या युवकाने पक्षाचा जीव वाचविण्याच्या प्रकारात सदरहू व्हिडिओ तील म्हणून सोशल मीडियावर टाकले असल्याची देखील चर्चा होती.मात्र तरीदेखील प्रशासनाने ह्या युवकावर देखील अशी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या