पोलिस दलातील "पोलिस महानिरीक्षक" दर्जाच्या अधिकाऱ्यांना "अपर पोलीस महासंचालक" पदी पदोन्नती देत महायुती सरकारने "मर्जी सांभाळणाऱ्या" अधिकाऱ्यांना पदोन्नती तर काहींना बदल्यांची चांगलीच "खिरापत" वाटली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक. २८.०२.२०२५ ला एका शासन आदेशान्वये राज्य पोलिस दलातील महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना अप्पर पोलिस महासंचालक पदावर पदोन्नती देण्याबाबत आदेश काढले आहेत.
अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील पदावर पदोन्नती देण्या साठी तयार करण्यात आलेल्या पोलीस महानिरीक्षक श्रेणीतील भारतीय पोलीस सेवेतील अधिका-यांच्या "निवडसूची-२०२५" मध्ये समाविष्ट असलेल्या भा.पो.से. अधिकारी यांची अप्पर महासंचालक दर्जाचे पदावर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) च्या कलम २२ न मधील तरतुदींनुसार पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे.
१) यशस्वी यादव
विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर, महाराष्ट्र राज्य, मुंबई
अपर पोलीस महासंचालक, सायबर, महाराष्ट्र राज्य, मुंबई (पद उन्नत करुन)
२) सुहास वारके
विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, मुंबई (रिक्त पदी)
३) अश्वती दोर्जे
विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
अपर पोलीस महासंचालक महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग,महाराष्ट्र राज्य, मुंबई व अपर पोलीस महासंचालक,नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (पद उन्नत करुन)
४) छेरिंग दोर्जे
विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई
अपर पोलीस महासंचालक
(विशेष अभियान), महाराष्ट्र राज्य, मुंबई (रिक्त पदी)
५) के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना
विशेष पोलीस महानिरीक्षक, (आस्थापना), महाराष्ट्र राज्य, मुंबई
अपर पोलीस महासंचालक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई (रिक्त होणा-या पदी) नियुक्ती देण्यात आली आहे.
"पोलीस महानिरीक्षक" श्रेणीतील पदावर पदोन्नती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या "पोलीस उप महानिरीक्षक" श्रेणीतील भा.पो.से. अधिका-यांच्या "निवडसूची-२०२५" मध्ये समाविष्ट भा.पो.से अधिकारी यांना पदोन्नती देत वरिष्ट पदावर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न मधील तरतुदींनुसार पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.
१) राजीव जैन
पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई
अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
२) अभिषेक भगवान त्रिमुखे
विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल. महाराष्ट्र राज्य, मुंबई (पद उन्नत करुन)
अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई (In situ) या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
भा.पो.सेवेतील अधिका-यांच्या बदल्या
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवार दिनांक २८.०२.२०२५ रोजी काढण्यात आलेल्या एका शासन आदेशान्वये पोलिस दलात कार्यरत वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
१) निखिल गुप्ता
अपर पोलीस महासंचालक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई,यांची बदलीने पदस्थापना
अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई (रिक्त पदी)
२) सुरेश मेखला
अपर पोलीस महासंचालक, महामार्ग सुरक्षा, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांची बदली
अपर पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे), महाराष्ट्र राज्य, मुंबई (रिक्त पदी)
३) मनोज कुमार शर्मा
पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन हजर
विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई,
४) आर. बी. डहाळे
संचालक, राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे
विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, महाराष्ट्र राज्य, पुणे (रिक्त पदी)
५) अशोक मोराळे
विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे
विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे. (रिक्त पदी)
६) श्रेणिक लोढा
अपर पोलीस अधीक्षक,अहेरी,गडचिरोली यांची नियुक्ती
अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा याठिकाणी करण्यात आली आहे.
७) तेगबिर सिंग संधु
सहायक पोलीस अधीक्षक/उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव, जि. नाशिक
अपर पोलीस अधीक्षक,मालेगाव,नाशिक ग्रामीण
८) शफकत आमना
सहायक पोलीस अधीक्षक/उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकर, जि. नांदेड
अपर पोलीस अधीक्षक, धाराशीव
९) धीरज कुमार बच्चु
सहायक पोलीस अधीक्षक/उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव, जि. बीड
अपर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण
१०) एम.व्ही.सत्यसाई कार्तिक
सहायक पोलीस अधीक्षक/उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा, जि. पुणे
अपर पोलीस अधीक्षक, अहेरी, गडचिरोली
११) अन्नपूर्णा सिंह
सहायक पोलीस अधीक्षक/उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर,जि.जळगाव
अपर पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण
अनिकेत भारती,भा.पो.से.पंकज कुमावत,भा.पो.से.गौहर हसन, भा.पो.से.यांच्या नियुक्तीचे आदेश नंतर काढण्यात येतील.


0 टिप्पण्या