मुर्तिजापुर येथील तहसील कार्यालय अंतर्गत हेंडज गावात तलाठी म्हणून कार्यरत प्रमोद पुंडलिक लांडगे यांनी तहसील परिसरात नैसर्गिक आपत्तीच्या पैशांबाबत विचारणा करणाऱ्या सेतू केंद्र चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवार दि.३० रोजी घडली असून याबाबत मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथील अक्षय गजानन गोसावी, वय २९ वर्ष हे गावात त्यांचे सेतू केंद्र चालवतात.गावातील शेतकरी हे त्यांचे नियमित ग्राहक असल्याने ते त्यांची कामे आस्थेने करत असतात. सेतु केंद्र असल्याने नैसर्गिक आपत्तीचे पैसे खात्यात जमा झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी गावातील काही शेतकरी त्यांचेकडे आले होते.त्यांनी दि.२९/०१/२०२५ रोजी E-Panchnama payment Disburesement Portal Relief and Rehabilitation department, Government of Maharashtra या शासकीय संकेतस्थळावर लाभार्थ्यांची यादी पाहीली असता त्यांना दाताळा गावाचे यादीमध्ये हनुमान संस्थानचे गट क्र.३४३ ची रक्कम १७,००० बाधीत क्षेत्र दोन हेक्टरचे पैसे ऑन लाईन आलेले दिसले.
प्रमोद पुंडलिक लांडगे यांच्या भ्रमणध्वनीवर बोलून त्यांना संस्थांनचे नैसर्गिक आपत्तीचे पैसे दुसऱ्या अकाउंटला कसे आले याबाबत माहिती सांगा अशी विनंती दि.२९ रोजी केली असता सदरहू तलाठी लांडगे ह्यांनी सेतू केंद्र चालक गोसावी यांना दि.३०/०१/२०२५ रोजी १२.०० वाजता तहसिल कार्यालय मुर्तीजापुर येथे भेटायला बोलावले. त्यानुसार दि.३०/०१/ २०२५ रोजी दुपारी २.०० ते ३.०० वाजता दरम्यान तहसील कार्यालय परिसरातील एका हॉटेलमध्ये तलाठी प्रमोद लांडगे यांची भेट घेतली. नैसर्गिक आपत्तीचे संस्थानचे पैसे बाबत विचारणा केली् तसेच इतर दोन क्रमांकाचे खातेदार देविदास खडे व रमेश गावंडे यांचे एक हेक्टरचे क्षेत्रफळ असुन यांना दोन हेक्टरची मदत दोन इतर व्यक्तींच्या खात्यात प्रत्येकी रक्कम १७,००० रूपये कसे काय जमा झाले ? याबाबत माहिती विचारली.सदर माहिती विचारल्या मुळे पित्त खवळलेल्या तलाठी लांडगे यांनी गोसावी ह्यांना एकदम उत्तेजीत होवून लाथा बुक्यानी मारहान केली. त्यांच्या डाव्या डोळयाचे खाली मारहान करून नाकावर जोरात बुक्का मारला. तसेच तेथेच असलेल्या स्टीलच्या भांड्याने मारहाण करून जखमी केले.सेतू केंद्र चालक गोसावी ह्यांनी याबाबत सोबत असलेल्या दोन व्यक्तींना घेवून तडक शहर पोलिस स्टेशन गाठून झाल्या प्रकाराची फिर्याद देण्यात आली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला अप ब.क्र.८०/२५ कलम ११७ (१), ३५१, (२) (३) बिएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक गणेश सुर्यवंशी करीत आहेत.
हेंडज गावातील शेतकऱ्यांना मिळालेल्या शासकीय अनुदानाची रक्कम ही सदरहू तलाठी प्रमोद पुंडलिक लांडगे ह्यांच्या आई देवकाबाई पुंडलिक लांडगे व त्यांची पत्नी प्रतिभा प्रमोद लांडगे ह्यांच्या खात्यात कसे काय गेले हा मात्र संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांचे पैसे तलाठ्यांच्या आई व पत्नीच्या खात्यामध्ये कसे काय गेले याबाबत तहसील कार्यालयात उलट सुलट चर्चेला उधान आलेले असून आपले बिंग फुटले आणि ते ह्या सेतू चालकाने फोडले याचा राग अनावर होवुन हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे बोलल्या जात आहे.
कालच अकोला जिल्ह्यातील अकोट उप विभागातील दोन तलाठ्यांना ह्याच नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानात शासनाची फसवणूक केल्याबद्दल निलंबित करण्यात आले असून आता पुन्हा तोच किस्सा मूर्तिजापूर तालुक्यातील देखील उघडकीस आल्याने अकोला जिल्ह्यातील तलाठ्यांना अशा कोणत्या विचित्र रोगाची लागण झालीय की ते आपल्या कार्यक्षेत्रा तील खातेदार शेतकरी व शासनाच्या पैशांवर डल्ला मारून त्यांची फसवणूक करायला लागले आहेत. याचा शोध घेणे आजरोजी अत्यंत गरजेचे झाले आहे.



0 टिप्पण्या