शिवसेनेच्या वैद्यकीय आघाडी जिल्हा प्रमुखपदी रोशन पर्वतकर...




     अकोट तालुक्यातील शिवसेनेचे संघटक तथा धडाडीचे समाजसेवक रोशन पर्वतकर यांची अकोला जिल्हा वैद्यकीय आघाडी जिल्हाप्रमुख या पदावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी काल नियुक्ती केली असून  याबद्दल रोशन पर्वतकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


    रोशन पर्वतकर हे अकोटचे माजी आमदार संजय गावंडे यांचे कट्टर समर्थक असून ते उत्कृष्ट संघटक आहेत.त्यांच्या या नियुक्तीने जिल्ह्यातील रुग्णांना निश्चितच लाभ होणार असून त्या पदासाठी लायक असलेल्या व्यक्तीची निवड केल्याबद्दल अनेकांनी गोपाल दातकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.


    रोशन पर्वतकर हे राजकीय, सामाजिक,रुग्णसेवा व आता गेल्या काही दिवसांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रातही कार्यरत झाले असून "वैद्यकीय आघाडी जिल्हाप्रमुख" या पदाच्या माध्यमातून आजन्म रुग्णसेवा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

    रोशन पर्वतकर हे आपल्या या नियुक्तीचे श्रेय माजी आमदार संजय गावंडे यांना देत असून या सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांनी यापुढेही आपली रुग्णसेवा अखंडित पणे चालवावी अशी आशा व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या