मातेसमान ६४ वर्षीय वृद्धेवर बलात्कार, युवकाला एका तासात पोलिसांनी केली अटक...




   वयाचेही भान न ठेवता आपल्या मातेसमान स्त्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक हव्यासापोटी एका ६४ वर्षीय महिलेवर ३८ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द इथे घडली आहे. 

   घरी सोडतो असे खोटे सांगून उमेश ढोके नावाचा हा नराधम चेंबूर मधील घरकाम व मासेविक्री करणाऱ्या त्या महिलेला मानखुर्द येथील आपल्या राहत्या घरी घेऊन गेला. रात्रभर तिच्यावर बलात्कार करीत राहिला, नंतर मारहाण करत पहाटे घराबाहेर विवस्त्र अवस्थेत त्याने तिला फेकून दिले. 

    या घटनेबाबत कळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पीड़ित महिलेला उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर आरोपी उमेश ढोकेलाही केवळ तासाभरातच अटक करून त्याची चौकशी सुरू केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याने लगेचच त्याच्यावर बलात्कार- मारहाण संबंधित कलमांतर्गत ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या सहकारी महिलांसह राजावाडी हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकरणातील पीडित महिलेची व तिच्या परीवाराची भेट घेतली. 

   आज पहाटेच पिडीतेला हॉस्पिटलला दाखल केल्याने अजुन दोन दिवसांनी पुन्हा एकदा तिच्याशी बोलून तिचे आणखी काही म्हणणे असेल तर त्याची नोंद घेतली जावी तसेच मनोधैर्य योजनेसाठीच्या कागदपत्रांची  पोलिसांनी लवकरात लवकर पूर्तता करून संबंधित विभागात पाठवावी ही विनंतीही पोलिसांना केली

   पोलिसांनी ज्या तत्परतेने आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला तितक्याच जलद गतीने कारवाई होत त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होईल, हे नक्की ! अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या