अकोला पोलीस दलाला "बदनामीचे काळे" फासणारा पोलीस शिपाई शिवम दुबे याला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज सायंकाळी एका तातडीच्या आदेशाद्वारे पोलीस दलातून "बडतर्फ" केले आहे.
अकोला पोलीस दलातच कार्यरत एक पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला फेसबुक द्वारे मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिच्याशी प्रेमाचे खोटे नाटक करीत वारंवार तिचे शारीरिक लैंगिक शोषण करून गेल्या काही दिवसांपासून पैशांसाठी "ब्लॅकमेल" करीत असल्याने संबंधीत महिलेने हा प्रकार आपल्या पोलीस सेवेतील पतीला सांगितला,आणि हा प्रकार ऐकून त्याच्याही पायाखालची जमीन सरकली, मात्र त्याने आपल्या पत्नीला समजून घेत मोठ्या हिंमतीने अकोट शहर पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार दिली होती.
या तक्रारीवरून अकोट शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस दलात ( एलसीबी )कार्यरत पोलीस शिपाई शिवम दुबे याच्याविरुद्ध बलात्कारासह विविध गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरु केला मात्र आरोपी शिवम दुबेला याची कुणकुण लागल्याने तो कुणाला काहीच न सांगता फरार होण्यात यशस्वी झाला आहे.अकोला पोलीस त्याचा सर्वत्र कसून शोध घेत असून अकोट शहर पोलीस व एलसीबीचे पोलीस त्याच्या मागावर असून लवकरच त्याला "बेड्या ठोकून" "गजाआड" करण्याची शक्यता आहे.
अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील संवेदनशील परिस्थिती व वाढता दबाव पाहून आरोपी पोलीस शिपाई शिवम दुबे याला तडकाफडकी "बडतर्फ" करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.अकोला पोलीस फरार असलेल्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत.




0 टिप्पण्या