दर्यापूरच्या गोळीबारातील दोन आरोपींना अटक...





    काल रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान अमरावती दर्यापूर मार्गावरील दर्यापूरच्या रफत पेट्रोल पंपानजीक एका चारचाकी वाहनातून आलेल्या मारेकऱ्यांनी उभ्या असलेल्या दुसऱ्या चारचाकी वाहनात बसलेल्या प्रवाशांवर केलेल्या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना पकडण्यात अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या  पोलिसांना यश आले असून इतर फरार आरोपींचा शोध जारी आहे.

     अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उप विभागीय पोलीस अधिकारी नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन दर्यापूर,स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही कारवाई केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या