अकोला जिल्ह्यातील अकोट हा एक अफलातून तालुका आहे,हे आता सगळीकडे माहीत झाले असून या तालुक्यात काहीही होऊ शकते.याची अनेक उदाहरणे देता येतील.जे कुठेच चालत नाहीत तेच लोकं या तालुक्यात लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आपण आज पाहतोच आहोत.अकोट तालुक्यात जितक्या समस्या आहेत तितक्या स्वतंत्र भारतात कुठेच नाहीत.तरीही या तालुक्यातील जनता हसत हसत त्यांचा सामना करीतच आहे,तेही कुणाला काहीच न म्हणता बोलता.असाच काहीसा प्रकार अकोटच्या महसूल विभागाच्या बाबतीत आहे.
गेल्या दीड वर्षांपासून अकोट तालुक्याला एकच तहसीलदार होते तेही महिन्यातून काही दिवसच कार्यालयीन कामाकरिता हजर असत तर इतर दिवस सुटीवरच असायचे. त्या कार्यकाळात लोकांची कोणतीच कामे होत नव्हती.त्याबद्दल लोकांच्या महसूल विभागविषयी "बोंबाबोंब" व्हायला लागल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याठिकाणी शिकाऊ तहसीलदारांना पाठवून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करून पाहिला.त्या दरम्यान अक्षय रासने नामक एक चांगले शिकाऊ तहसीलदार आल्याने लोकांची कामे बऱ्याच प्रमाणात झाली.परंतु त्यांचा सहा महिन्यांचा कालावधी संपल्याने ते येथून निघून गेलेत व पुन्हा त्या पदावर एक आणखी नवीन तहसीलदार विजय सवडे यांना सहा महिन्यांसाठी पाठविण्यात आले आहे.तर त्याच दरम्यान नियमित तहसीलदार म्हणून सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिकाऊ तहसीलदार विजय सवडे यांच्याकडे अकोट तहसील मधील विद्यार्थ्यांना लागणारे दाखले,पतदारी प्रमानपत्र व संजय गांधी यासारखे महत्वाचे विभाग देण्यात आले आहेत.शिकाऊ तहसीलदार सवडे यांना तहसील कार्यालयांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांची माहिती व्हावी यासाठीच त्यांचा हा प्रशिक्षणाचा सहा महिन्यांचा कार्यकाळ आहे.मात्र हे प्रशिक्षणार्थी तहसीलदार शिकण्यासाठी नाहीतर याठिकाणी कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिकविण्यासाठी आल्याच्या आविर्भावात वागत असून त्यांच्या अशा वागण्याने तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर कार्यालयात कामे करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी "डोकेदुखी" ठरत आहेत.सरळ सरळ असलेल्या कामांना उलटे करून ठेवण्याची सवडे ह्यांची वृत्ती असल्याने ते नियमित अधिकाऱ्यांसाठी "ताप" ठरत आहेत.
गेल्याच आठवड्यात अकोट शहरातील वासुदेव लक्ष्मणराव भास्कर यांनी त्यांच्या काही कामासाठी ३ लाख रुपयांचे पतप्रमाणपत्र ( सालव्हनसी सर्टिफिकेट ) मिळण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता,त्यासाठी लागणाऱ्या सर्वच कागदपत्रांची त्यांनी पूर्तता केली होती.विहित कालावधीत त्यांना हे प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित होते.मात्र भास्कर यांना चकरा मारल्यावर ह्या शिकाऊ तहसीलदार ह्यांनी फक्त एक महिन्याचे पतप्रमाणपत्र दिले.गेल्या अनेक वर्षांपासून हे पत प्रमाण पत्र एक वर्ष कालावधीचे देण्यात येत असताना अकोट तहसीलमधील ह्या सवडे नामक शिकाऊ तहसीलदार यांनी फक्त एक महिना कालावधीचे दिले व आजपर्यंत यापूर्वीच्या तहसीलदार ह्यांनी केलेल्या चुका मी करणार नाही,त्यांनी दिलेले एक वर्ष मुदतीचे पतप्रमाणपत्र हे चुकीचे होते असे सांगून त्या अधिकाऱ्यांना मूर्खात काढण्यास कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.
याबाबत संबंधित अर्जदार यांनी अकोटचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनीही या तहसीलदार ह्यांना समजावन्याचा प्रयत्न करून पाहिला पण त्यांनाही ह्या शिकाऊ तहसीलदारांनी काहिच जुमाणले नाही व मी सांगतो तोच नियम आहे हे अगदी अट्टाहासाने सांगितले. याबद्दल तक्रारदार वासुदेव भास्कर ह्यांनी अकोला जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी ह्यांच्याकडे तक्रार केली असून एक वर्ष मुदतीचे प्रमाणपत्र देण्याची व ह्या "अडेलतट्टू" शिकाऊ तहसीलदार विजय सवडे ह्यांना समज देऊन सर्वसामान्य नागरिकांसोबत सौजन्याने वागण्याचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली आहे.







0 टिप्पण्या