अकोट शहरातील निरपराध ९ वर्षीय सावत्र मुलाला पळवून निर्जनस्थळी नेवून जीवाने ठार करणारा आरोपी बाप आकाश कान्हेरकर याचा जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने आज फेटाळला आहे.
अकोट दिनांक ०३.०८.२०२६ रोजी येथील वि. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बी.एम. पाटील यांनी
अकोट शहर पोलीस स्टेशनला दाखल अप. क्र. २४९/२०२५ चे कलम १३७ (२), १०३(१),२३८,१४०(१), ३(५) भान्यासं. मधील आरोपी आकाश साहेबराव कान्हेरकर वय ३२ वर्ष, रा. हिरापुर ता. अंजनगाव, जि. अमरावती याचा पत्नी दुसरे अपत्य होवु देत नाही या कारणावरुन आरोपी क.२ च्या सोबत संगणमत करुन निरपराध सावत्र मुलाला मोटारसायकलवर बसुन निर्जनस्थळी नेवुन त्याला लाथा बुक्क्यानी मारहाण करुन त्यास जिवाने ठार केल्याच्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर दाखल केलेला जामीनअर्ज आज दि.३.८.२०२६ रोजी नामंजूर करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपी अकोला कारागृहात दि.३.७.२०२५ पासून बंदीस्त आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जावर विरोध करतांना युक्तीवाद केला की, या प्रकरणात फिर्यादीच्या फिर्यादीवरून या प्रकरणात वरील प्रमाणे आरोपीविरूध्द गुन्हयाची नोंद झाली व तपासानंतर सर्व आरोपींविरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालेले आहेत. या प्रकरणात आरोपी क्रमांक १ आकाश साहेबराव कान्हेरकर याने फिर्यादी ही दुसरे अपत्य होवु देण्यात तयार नव्हती, त्यामुळे तिला असलेल्या २ अपत्यापैकी एक अपत्याचा मृत्यु झाल्यास ती दुसरे अपत्य करण्यास तयार होईल या विचारातुन आरोपी क्रमांक १ याने आरोपी क्रमांक २. गौरव गायगोले याचेसोबत संगणमत करुन मृतक वय ९ वर्ष याचा खुन केल्याचे निष्पन्न होत असल्याने व आरोपीविरुद दोषारोपपत्रात भरपुर साक्षीपुरावे उपलब्ध झाल्याने वर नमुद आरोपीविरुध्द दोषारोपपत्र तयार करुन वि.न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर गुन्हयाचे तपासात अकोट शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज पाहिले असता सदर फुटेजमध्ये फिर्यादीचा ९ वर्षीय मुलांस तिचा दुसरा पती व त्याचा मित्र नामे गौरव वसंता गायगोले हे दोघेजण मोटारसायकलने त्याला पोपटखेड रोडने घेवुन जातांना दिसल्यावर फिर्यादीच्या दुस-या पतीस ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने कबुली निवेदन दिले आहे की, सावत्र अल्पवयीन मुलास त्याने त्याचे मित्रासह दुपारी अंदाजे ३.०० वाजताचे सुमारास घराचे बाहेर बोलावुन व त्याचेकडील मोबाईल स्वतः जवळ घेवुन ९ वर्षीय मुलास त्याने त्याचे मित्रासह दुपारी ३.०० वाजताचे सुमारास घराचे बाहेर बोलावुन व त्याचे कडील मोबाईल स्वत : जवळ ठेवुन घेवुन ९ वर्षीय मुलास मोटारसायकलवर बसवुन मागे त्याचा मित्र गौरव यास बसविले व पोपटखेड मार्गे वस्तापुर, खिरकुंड भागात घेवुन जावुन निर्जनस्थळी ९ वर्षीय मुलाचे नाक तोंड दाबुन व त्याचे नाकावर बुक्क्यांनी मारहाण करुन त्यास जिवे ठार केले. अशा कबुली जबाबावरुन सदर आरोपीला घेवुन घटनास्थळी नेले व ९ वर्षीय अल्पवीयीन मुलाचा खिरकुंड गावाचे समोर चिंचोणा जि. अमरावती शिवारात वनविभागाचे जंगलात एका पोत्यात आरोपीतांनी लपवुन ठेवलेला मृतदेह आढळून आल्याने सदर ठिकाणावरुन गुन्हयाच्या तपासकामी मृतदेह लपविण्यासाठी आरोपीतांनी वापरलेले पोते, एक केसरी दोरी, साधी माती, मृतकाचा चप्पल जोड, एक काळा धागा, घटनास्थळावरील लाकडास लागलेल्या रक्ताचा कापसाच्या बोळ्यावर घेतलेला नमुना इत्यादी मुददेमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात येवुन सदर गुन्हयात वाढीव कलम १०३,२३८,१४०(१), ३ (५) बी. एन. एसच चे कलम समाविष्ट करण्यात आले. वरील प्रकरण हे गंभीर स्वरुपाचे असुन एका निरपराध अल्पवयीन मुलाला जिवाने ठार मारण्याच्या गुन्हयातील आहे. आरोपीस जामीन झाल्यास तो फिर्यादी व इतर साक्षीदार दबाव आणु शकतो. त्यांना प्रलोभन देवुन अन्य मार्गाने साक्षीदारांना भिती दाखवुन सदरील प्रकरण विद्यमान न्यायालयासमक्ष चालविण्याकरीता अडथळे निर्माण करु शकतो व साक्षीदार यांना साक्ष देण्यापासुन परावृत्त देखील करु शकतो. तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या जीवीत्वास धोका निर्माण होवु शकतो, सरकार पक्ष हा खटला जलद गतीने चालविण्यास तयार आहे. तसेच आरोपीने सदर गुन्हा केल्याबाबत कबुली जवाब दिला आहे. तसेच आरोपी व मृतक जवळ असलेल्या फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर व एसडीआर काढण्यात आले आहेत. तसेच या प्रकारणात मृतक अल्पवयीन मुलाच्या आईची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया न्यायालयात सुरु झालेली आहे. या प्रकरणामधे जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा प्रस्तावित आहे व आरोपीला शिक्षा होण्याइतपत पुरावा दोषारोप पत्रामधे उपलब्ध आहे त्यामुळे आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. दोन्ही पक्षाच्या प्रत्यक्षदर्शी पुरावा व युक्तीवादानंतर वि. कोर्टाने आरोपीचा जामीनअर्ज नामंजूर केला. जरी या प्रकरणात नसला तरी सीसीटीव्ही फुटेज हा तिसरा डोळा म्हणुन महत्वाचा पुरावा या प्रकरणात आहे याची दखल विद्यमान न्यायालयाने आदेशामध्ये घेतली आहे.


0 टिप्पण्या