९ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी बाबुराव धांडे यास ०५ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा अकोट सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.
आज दि.२४.०७.२०२६ रोजी अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी पो.स्टे.अकोट ग्रामिणला दाखल अपराध क्रमांक २७९/२०२२ विशेष खटला क्र.५०/२०२२ कलम ३५४,३५४ (अ) भादंवि. सहकलम १० पोक्सो ऍक्ट मधील आरोपी बाबुराव नरी धांडे, वय अंदाजे ५० वर्ष धंदा मजुरी रा.आसेगाव बाजार,ता. अकोट जि.अकोला यांचे विरुध्द वरीलप्रमाणे गुन्हा सिध्द झाल्याने त्यानें ०९ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाबद्दल ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रु. १०,००० (रूपये दहा हजार फक्त) द्रव्यदंड व दंड न भरल्यास तिन महिने अधिकचा सश्रम कारावास अशा प्रकारे शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम आरोपीने भरल्यास १० हजार पिडीतेला नुकसान भरपाई म्हणुन देण्यात यावेत असेही आदेशात नमुद केले आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनुप्रिती ढवळे यांनी न्यायालयात युक्तीवाद केला की या प्रकरणात दि. ०९.०७.२०२२ रोजी फिर्यादी यांनी पो.स्टे. अकोट ग्रामिण येथे फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरुन आरोपीविरुध्द ३५४,३५४ (अ) भादंवि., सहकलम ७,८,९ (एम) १० पोक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद दाखल झाला. तपासअधिकारी पो.उपनि.विजय पंचबुध्दे यांनी आरोपी विरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असता सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनुप्रिती ढवळे यांनी शिक्षेसंबधी न्यायालयात युक्तीवाद केला की, आरोपीने केलेला गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहेत. तसेच अल्पवयीन पिडीतेने बालकल्याणसमिती समोर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांचे समक्ष नोंदविण्यात आलेल्या बयाणात देखील तिच्या विरुध्द आरोपीने केलेल्या लैगिक अत्याचाराचा उल्लेख आहे व तसाच पुरावा देखील अल्पवयीन पिडीतेने न्यायालयासमक्ष दिला आहे. अशा आरोपीला दया दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जावु शकतो. अशा विकृत मनोवृत्तीच्या आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा विनयभंग केला असल्याने आरोपीला कुठल्याही प्रकारची दयामया न दाखविता जास्तीत-जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी. या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख व प्रार्थना सहारे मॅडम सहकार्य केले.
अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनचे पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस शिपाई शंकर राउत बं.नं.२५१६ यांनी सहकार्य केले व दोन्ही पक्षाच्या अंतीम युक्तीवादानंतर वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील अकोट यांनी आरोपी बाबुराव धांडे याला वरीलप्रमाणे ५ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा द्रव्य दंडासह ठोठावली आहे.


0 टिप्पण्या