नवविवाहितेशी लग्नाची जबरदस्ती करणाऱ्या आरोपीला जामीन नाकारला...



   तेल्हारा तालुक्यातील एका नवविवाहित तरुणीशी लग्न करण्याची जबरदस्ती करीत तिच्या सासरी जावून त्या नवविवाहीत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या खाजगी शिकवणी वर्ग चालवीणारा आरोपी अमोल इखारे याचा अटकपूर्व जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे.


  अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या अप. क्र.३५८/२०२६, कलम ७४,३२९ (१),३५१ (१) भान्यासं. मधील आरोपी अमोल अजाबराव इखारे, वय २८ वर्ष राहणार शिरसंगाव ता.शेगांव जि.बुलढाणा याने नवविवाहीत पिडीत महिलेच्या सासरी जावून लग्न करण्याची जबरदस्ती करीत त्या नवविवाहितेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात सदरहू आरोपीचा अटकपुर्व जामीन अर्ज काल सोमवार दि.२०.०७.२०२६ रोजी अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी नामंजूर केला आहे.


   या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी आरोपीने दाखल केलेल्या जामीन अर्जाला विरोध करतांना युक्तिवाद केला की, या प्रकरणातील फिर्यादीने पो.स्टे. हिवरखेड येथे दि. ०७.०७.२६ रोजी अशी फिर्याद दिली की, दि. १८.०६.२०२६ रोजी फिर्यादीचे लग्न तिच्या  आतेभावा सोबत फिर्यादीच्या मर्जीने शेगाव येथे समाजाचे रितीरीवाजाप्रमाणे झाले आहे. फिर्यादीचे वडीलांची घरची गरीब परीस्थीती होती, फिर्यादी शेगावला वर्ग १२ विला शिकत असतांना १२ वीचा शिकवणी वर्ग अमोल अजाबराव इखारे याचे कडे लावला होता. आरोपी अमोल इखारे याने फिर्यादीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन फिर्यादीकडुन आधार, जन्मप्रमाणपत्र, तिच्या घरचे वीज बील, १० वीची मार्कलीस्ट असे सर्व कागदपत्रे फिर्यादीने अमोल इखारे यांना दिले होते.

   दरम्यानच्या काळात फिर्यादीचे लग्न झाल्याने दि.२०.०६.२६ रोजी फिर्यादीचे सासरी सत्यनारायणाच्या पुजेचा कार्यक्रम असल्याने घरातील सर्व लोक हे पुजेची तयारी करीत होते. समोरचे खोलीत फिर्यादी तीची सासु, ननद व इतर काही महिला यांचे सोबत बसलेली होती. सकाळी १०.३० वा.चे दरम्यान फिर्यादीचे सासरचे घरातील समोरचे खोलीमध्ये अमोल निखारे अचानक आला व फिर्यादीला म्हणाला की तु परस्पर लग्न का केले.? मला तु आवडत होती असे म्हणुन त्याने जबरदस्तीने फिर्यादीचा हात पकडुन घराबाहेर ओढु लागला व म्हणत होता की, त्याचे सोबत लग्न कर व त्याला फिर्यादीसोबत लग्न करायचे आहे असे कृत्य जबरदस्तीने करीत असतांना तिथे फिर्यादीचे सासरे,सासु व ननद त्याला बोलु लागले की तु कोण आहेस, इथे कशाला आला तेव्हा त्याने सर्वांना शिवीगाळ करुन तिथुन निघून गेला.आरोपीने विनयभंग करुन लज्जास्पद कृत्य केले आहे. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला. सदर गुन्हा हा गंभीर गुन्हा आहे. गुन्हा घडल्यापासुन आरोपी फरार  असुन त्याने त्याचा मोबाईल बंद करुन ठेवला आहे. नमुद आरोपीचे कृत्यामुळे फिर्यादीच्या मनात भिती निर्माण झाली आहे. आरोपीला जामीन दिल्यास तो फिर्यादीला त्रास देवुन त्यातुन आणखी गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी यास जामीन दिल्यास आरोपी हा साक्षीदार व फिर्यादी यांचेवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आरोपीला कायद्याबद्दल भिती व आदर राहणार नाही. फिर्यादीचा नविन संसार बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या प्रकरणात पो.स्टे. हिवरखेडचे पो.उपनि.गोपाल बिलबिले तपास करीत असून तपास पुर्ण झालेला नाही. त्यामुळे आरोपीची पोलीस कस्टडी मध्ये सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला तसेच त्यांना सहा.सरकारी वकील अनुप्रिती ढवळे यांनी सहकार्य केले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.एम.पाटील यांनी आरोपी अमोल निखारे याचा अटकपुर्व जामीनअर्ज नामंजुर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या