काँग्रेस नेते हिदायत पटेल खून प्रकरणातील आरोपी बद्रुजमाचा जामीन सुप्रीम कोर्टाने नाकारला...



   अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते हिदायत पटेल यांच्यावर जानेवारी २६ मध्ये त्यांच्या गावातच मजीद परिसरात चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते.जीवन मृत्यूशी झुंज देत असताना  दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना मृत्यूने कवटाळले होते.

   याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके व अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी एकत्रितपणे तपास करून याप्रकरणातील मुख्य हल्लेखोर आरोपीला अकोट तालुक्यातील पणज येथून अल्पावधीतच अटक केली होती.तर इतर काही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते.

    फरार आरोपींमध्ये मोहाळा गावातीलच फाजील आसीफ खाँ, फारुख आसीफ खाँ पटेल,अकोट नगर पालिकेचे माजी अध्यक्ष संजय रामदास बोडखे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गटाचे मो.बद्रुजमा मो.आदिल व माजी जिल्हा परिषद सदस्य राजू बोचे यांचा समावेश होता.मात्र गेल्याच महिन्यात यातील राजू बोचे यांना नागपूर पोलिसांनी अटक करून अकोट ग्रामीण पोलिसांच्या हवाली केल्यावर न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


   तर यातील गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मो.बद्रुजमा मो.आदिल यांनी अकोटच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता मात्र तो फेटाळण्यात आल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती,परंतु तेथेही जामीन नाकारण्यात आल्याने त्यांनी गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी शरण घेतली होती.


   आज दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात बद्रुजमा यांचे जामीनाचे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले असता त्यावर दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यावर त्याठिकाणी सुद्धा बद्रुजमा यांना अपयशाचा सामना करावा लागला.त्यामुळे त्यांना आता अकोट ग्रामीण पोलिसांना शरण आल्या शिवाय दुसरा कोणताच मार्ग शिल्लक उरलेला नाही,ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

    आजरोजी ह्या संपूर्ण राज्यात गाजलेल्या खून प्रकरणात एकूण तीन आरोपी कारागृहात असून चार आरोपी अद्यापी फरारच आहेत.ह्या उर्वरित आरोपींना पोलिस कधी अटक करतात ह्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या