सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अँड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती...



    गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात प्रचंड प्रमाणात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अँड.उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अँड.बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


     या हत्याकांड प्रकरणातील एक वगळता जवळपास सर्वच आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.हे प्रकरण राज्यभरात फार मोठ्या प्रमाणात गाजत आल्याने सरकार विरोधात जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊ नये म्हणून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या