गेल्या वीस वर्षांपूर्वी संपूर्ण विदर्भात खळबळ उडवून देणाऱ्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणाचा खटला नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरु असून या घोटाळा प्रकरणांत आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.या घोटाळ्याला जबाबदार असलेले बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माजी मंत्री सुनील केदार यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय १२ लाख ५० हजार रुपये रक्कम भरण्याचेही आदेश देण्यात आला आहे.शिवाय आता त्यांना पाच वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी सुद्धा जाणार आहे.
सुनील केदार न्यायालयात पोहचल्यावर आणखी एक आरोपी ( नंदकिशोर त्रिवेदी ) याचा अपघात झाल्याने तो रुग्णालयात असल्याने त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे कनेक्ट करण्यात आले.
त्यानंतर निकालपत्रच सुनावणी झाली. सुनावणीवेळी एकूण ८ आरोपी न्यायालयात हजर होते. यावेळी निर्णय देताना कोर्टाने तत्कालीन बँक अध्यक्ष सुनील केदार, मुख्य रोखे दलाल केतन शेठ, तत्कालीन बॅंक मॅनेजर अशोक चौधरी या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी मानले आहे. तर इतर तिघांना निर्दोष जाहीर केले आहे. शिक्षेच्या प्रमाणावर युक्तिवाद होत असून सहा दोषींच्या वकीलांनी यावेळी युक्तीवाद केला.
मुंबई,कोलकाता आणि अहमदाबाद इथल्या काही कंपन्यांनी बँकेकडून घेतलेल्या रकमेतून १५० कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. त्यानंतर या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही तसेच बँकेची रक्कमही परत केली नाही.याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर जिल्हाभरात चांगलीच खळबळ उडाली होती. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर २२ नोव्हेंबर २००२ ला न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्या गेले होते तेव्हापासून हा खटला प्रलंबित आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी ३० नोव्हेंबरपर्यंत निकाल द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर आज २२ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे.


0 टिप्पण्या