अकोला तहसील कार्यालयातील लाच प्रकरणांत एसीबीच्या कारवाईत अडकलेले तहसीलदार सुनील पाटील हे गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून अटक टाळण्यासाठी फरार होते.अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना याप्रकरणांत अटकपूर्व जामीन नाकारल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली असता काल सोमवार दि.२१/८/२०२३ ला त्यांना अटकेपासून सुटकेसाठी दिलासा दिला आहे.
नागपूर खंडपीठाचे आदेशानुसार त्यांना २५,००० रुपयांचा जामीन हमी, वैयक्तिक जातमुचलका देऊन दर बुधवारी संबंधित पोलीस स्टेशनला हजेरी लावून एसीबीच्या अधिकाऱ्यांना तपासकामी सहकार्य करण्याच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
आज दुपारी तहसीलदार सुनील पाटील हे अकोला तहसील कार्यालयातील आपल्या कार्यालयात देखील जाऊन आल्याची माहिती आहे.मात्र सुनील पाटील यांच्या बाबतीत अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या