उभ्या आयुष्यात नोकरी करीत असताना निव्वळ "पैसा पैसा" करणारे खूप अधिकारी व कर्मचारी या राज्यात आहेत.यातील काही सरळसरळ पैसे घेत असताना एसीबीच्या जाळ्यात अडकतात तर काही शिताफीने यातून सही सलामत सुटतात.मात्र जास्त हुशारी दाखवणारे,पैशांसाठी मरमर करून घर,शेती,प्लॉट,फ्लॅट,गाड्या यासोबतच पैशांचे "गाठोडे" जमा करणारे, कधी ना कधी एसीबीचे शिकार होतातच.आणि हेच "अतिशहाने" मग अपसंपदेच्या प्रकरणांत आपल्या परिवाराला सोबत घेवून "जेलयात्रेला" जातात.



0 टिप्पण्या